सोने विकायचे असेल तर ‘हे’ जाणून घ्या!

200

घरोघरी लग्नसराई, सणउत्सव आले की आवर्जून सोने खरेदी केली जाते. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेक लोक अडचणीच्या काळात मोडता येईल या विचाराने सोने खरेदी करून ठेवतात. परंतु अनेकदा जुने सोने विकायला गेल्यावर त्याचे रोख पैसे मिळतातच असे नाही असे का होते किंवा सोने विकून रोख रक्कम देताना काय अडचणी येतात याविषयी माहिती जाणून घेऊया…

( हेही वाचा : डेक्कन क्वीनमध्ये आता चॅटबाॅट सुविधा, असा करा मजेशीर प्रवास! )

सोने विकताना अनेकदा रोख पैसे मिळत नाही असे का?

  • भारतातील अनेक सोनार (ज्वेलर्स) हे सोन्याचे किरकोळ विक्रेते असतात त्यामुळे विकली जाणारी वस्तू किरकोळ विक्रेत पुन्हा खरेदी करत नाहीत. ओळखीच्या किंवा काही ठराविक दुकानात दागिने विकून रोख पैसे घेण्याची सुविधा उपलब्ध असते.
  • सोने विकताना अनेकवेळा ग्राहकांकडे सोने कधी विकत घेतले, किंमत किती, घडणावळ याविषयीची पोचपावती किंवा माहिती नसते त्यामुळे जुने सोने विकताना ग्राहकांना पैसे देताना सोनारांना अडचण येते.
  • हॉलमार्कमुळे न केलेले सोन्याचे दागिने कोणीही पुन्हा विकत घेत नाही.
  • अनेकवेळा सोन्याचे भाव उच्चांक गाठतात तेव्हाच ग्राहक सोने विकतात. रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याचे भाव वधारले होते परंतु अशा परिस्थितीत दर कमी-जास्त होण्याच्या भितीने ज्वेलर्स जुने सोने पुन्हा विकत घेणे टाळतात.
  • सोने खरेदी-विक्री संदर्भात माहिती हवी असल्यास इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच जुने सोने विकण्यापेक्षा सोने एक्सेंज ( Gold exchange), गोल्ड सेव्हिंग फंड ( Gold Saving Fund) या पर्यायांची निवड करा असा सल्ला तज्ज्ञ देतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.