- ऋजुता लुकतुके
लेक्सस हा मूळातच प्रिमिअम श्रेणीतील कारचा ब्रँड आहे. आणि त्यात एलएम २०२४ ही एसयुव्ही त्यातल्या अल्ट्रा-प्रिमिअम सुविधांमुळे तुम्हाला राजेशाही अनुभव देईल. भारतात ही गाडी ४ सीटर आणि ७ सीटर अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. गेल्याच आठवड्यात लेक्सस एलएम २०२४ या कारचं भारतातील बुकिंग सुरू झालं आहे. आणि तिची किंमत तब्बल २ कोटी रुपयांपासून सुरू होतेय. या गाडीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे चालकाच्या मागच्या रांगेत समोर पूर्ण जागा भरेल असा मोठा डिजिटल डिस्प्ले आहे. आणि घरातील टीव्हीवर दिसतो तशी करमणुकीचा मजा तुम्हा यात घेऊ शकता. चालकासमोरचा डिस्प्लेही मोठाच आहे. (Lexus LM 2024)
हायब्रीड इलेक्ट्रिक व्हर्जन सध्या फक्त युरोपीयन आणि अमेरिकन बाजारापेठेतंच उपलब्ध आहे. भारतात ही गाडी पेट्रोल इंजिनातच सध्या उपलब्ध झाली आहे. पण, या इंजिनाची क्षमताही ३,४६५ सीसी इतकी तगडी आहे. गाडीतील सर्वोच्च वेग मर्यादा ताशी १९० किलोमीटर इतकी आहे. शून्यापासून १०० किलोमीटर पर्यतचा वेग ही गाडी ८.७ सेकंदांत गाठू शकते. ही लेक्ससची नवीन पिढीची कार मानली जात आहे. आणि डिसेंबरमध्ये कंपनीनं गाडीचं बुकिंगही सुरू केलं आहे. (Lexus LM 2024)
2024 Lexus LM Launched!
.
– Offer 2 seating configuration – 4 and 7 seater
– 48-inch screen for rear passengers
– Mark Levinson 3D surround sound system – 23 speakers
– 2.5L hybrid petrol engine
– All-wheel drive
.#V3Cars #Lexus #LexusIndia #LexusLM #LM #LaunchSoon pic.twitter.com/Coi1MmDL9C— V3Cars (@v3cars) March 15, 2024
(हेही वाचा – JNU Students Association : जेएनयूवर पुन्हा डाव्यांचाच पगडा; विद्यार्थी निवडणुकीत चारही पदांवर एलडीएफ)
या राजेशाही गाडीची सुरुवातीची किंमत आहे इतकी
२.४ लीटर हायब्रीड टर्बोचार्ज आणि २.५ लीटर हायब्रीड पेट्रोल अशा दोन इंजिनांचे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असतील. वातावरण आल्हाददायक ठेवण्यासाठी डुआल झोन क्लायमॅट कंट्रोल यंत्रणा यात बसवण्यात आली आहे. त्यामुळे गाडीतील सगळ्या सीट या व्हेंटिलेटेड असतील. त्यासाठी इन्फ्रा-रेड सेनसरही बसवण्यात आला आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे चालकाच्या मागे बसलेल्या लोकांसाठी ४८ इंचांचा मोठा डिजिटल डिस्प्ले असेल. शिवाय वायरलेस चार्जिंगची सोयही असेल. (Lexus LM 2024)
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात प्रत्येक प्रवाशाला स्वतंत्र एअरबॅग असेल. इ-लॅच फ्रंट डोअर प्रणाली असेल. आणि चालकाच्या सुरक्षेसाठी एडीएएश सुरक्षा प्रणालीही असेल. चालकाने मार्गिका बदलली तर ही गाडी त्याचा धोक्याचा इशारा चालकाला देईल. तसंच पुढील गाडीबरोबरचं अंतर कमी झालं तर त्याचीही आगाऊ सूचना देईल. (Lexus LM 2024)
अशा या राजेशाही गाडीची सुरुवातीची किंमत १.२ कोटी रुपयांपासून सुरू होते. आणि ७ सीटर हाय-एंड गाडीची किंमत २ कोटींपर्यत जाऊ शकते. या गाडीची स्पर्धा असेल ती टोयोटा वेलफायरशी. बुकिंगला भारतात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं लेक्सस कंपनीचं म्हणणं आहे. आणि प्रवाशांना आणखी सहा महिन्यांत गाडीची चावी मिळायला लागेल. (Lexus LM 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community