-
ऋजुता लुकतुके
जीवन बिमा निगम अर्थात, एलआयसीने डिसेंबरमध्ये त्यांची नवीन विमा योजना सुरू केली आहे. जीवन उत्सव असं तिचं नाव असून ही योजना अल्पावधीतच लोकांमध्ये यशस्वी झाली आहे. तिच्या जोरावरच भारतीय ग्राहकांनी एलआयसीच्या समभागांनाही मागच्या आठवड्यात मोठा प्रतिसाद दिला. याचं पर्यवसान एलआयसीच्या समभागांत १० टक्क्यांनी वाढ होण्यात झालं. तर एलआयसी कंपनीचं बाजार भांडवलही पुन्हा एकदा ५ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचलं. (LIC Jeevan Utsav)
इतकं यश या शेअर बाजाराशी संलग्न नसलेल्या योजनेनं एलआयसीला अल्पावधीत मिळवून दिलं आहे. या योजनेविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. जीवन उत्सव ही निवृत्ती काळातील आर्थिक नियोजनासाठी मदत करणारी योजना आहे. ही योजना नॉन लिंक्ड आणि नॉन पार आहे. म्हणजेच इथं गुंतवलेले पैसे शेअर बाजारात गुंतवले जात नाहीत. या योजनेत तुम्हाला अंतरिम लाभांश किंवा वर्षभरात कुठलाही अतिरिक्त लाभ मिळत नाही. पैसे योजनेची मुदत संपल्यावर एकमार्गी तुमच्याकडे जमा होतात. (LIC Jeevan Utsav)
(हेही वाचा – रामनवमीला भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री पुलाचे PM Narendra Modi करणार उद्घाटन; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्य?)
Introducing LIC’s Jeevan Utsav – Get 10% of Sum Assured every year for lifetime* along with Whole Life Insurance Cover. For more details, contact your LIC Agent/Branch or visit https://t.co/UDPQ8dBLYr
*Conditions apply#LIC #JeevanUtsav #LICJeevanUtsav #WholeLifePlan pic.twitter.com/RRpNrLGgwQ— LIC India Forever (@LICIndiaForever) November 30, 2023
योजनेची मुदत संपल्यावर तुम्हाला दोन प्रकारे यातून परतावा मिळवता येतो. हे दोन पर्याय आहेत, नियमित मिळकत (रेग्युलर इनकम बेनिफिट) आणि फ्लेक्झी इनकम बेनिफिट. रेग्युलर इनकम बेनिफिट अंतर्गत, योजनेची मुदत संपल्यावर विमाधारकाला गुंतवलेल्या रकमेवर जी किमान रकमेची हमी दिली गेली असेल त्या रकमेच्या १० टक्के रक्कम दरवर्षी दिली जाईल. ही रक्कम महिन्याला किमान १५,००० रुपये इतकी असेल. तर फ्लेक्झी इनकम बेनिफिट अंतर्गत, विमाधारकाला किमान हमी रकमेच्या दहा टक्के रक्कम दरवर्षी काढून घेता येईल. पण, ती कधी आणि कशी घ्यायची याची निवड करण्याचा अधिकार विमाधारकाला असेल. (LIC Jeevan Utsav)
विमा योजनेच्या मुदतीत दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नामांकित व्यक्तीला एकूण भरलेल्या प्रिमिअमपेक्षा १०५ टक्के जास्त रकमेची हमी असेल. योजनेची मुदत पूर्ण झाली असल्यास योजना सुरू होताना मृत्यूनंतर देय रक्कम जी मान्य झाली असेल तेवढी रक्कम जवळचे नातेवाईक किंवा नामांकन झालेल्या व्यक्तीला मिळतील. मृत्यूनंतर देय रकमेत मुदतीच्या कालावधीत जमा झालेले इतर भत्तेही जमा केले जातील. वयाचे ९० दिवस पूर्ण केलेली कुठलीही व्यक्ती जीवन उत्सव योजना घेऊ शकते. वयाची कमाल मर्यादा ६५ वर्षांची आहे आणि योजनेची मुदत ५ ते १६ वर्षे इतकी आहे. (LIC Jeevan Utsav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community