व्हॉट्सअ‍ॅपवर एका क्लिकवर मिळणार LIC च्या सुविधा! कसे कराल रजिस्ट्रेशन? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

134

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC पॉलिसीधारकांसाठी आनंदाची बातमी असून आता LIC च्या काही सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप सेवेच्या माध्यमातून घरबसल्या या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ ई-टॅक्सी लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत; ओला-उबेरपेक्षा स्वस्तात होईल प्रवास!)

पॉलिसीधारकांना LIC पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर मोबाईल क्रमांक ८९७६८६२०९० या क्रमांकावर Hi मेसेज करा. त्यानंतर ग्राहकांना याद्वारे जवळपास ११ पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर Hi मेसेज पाठवल्यावर ते LIC शी कनेक्ट होतील आणि स्क्रिनवर संबंधित सेवांची यादी दिसेल. तुम्ही गरजेनुसार संबंधित सेवांवर क्लिक करून माहिती घेऊ शकता.

कोणत्या सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार ?

  • देय प्रिमियम
  • बोनसची माहिती
  • धोरणांची स्थिती
  • कर्जांच्या पात्रतेचे कोटेशन
  • कर्जाच्या परतफेडीचे कोटेशन
  • कर्जाचे देय व्याज
  • प्रिमियम पेमेंट प्रमाणपत्र
  • युलिप-युनिट्सचे तपशील
  • LIC सेवा लिंक
  • सेवा निवडणे/ निवड रद्द करणे
  • संभाषण थांबवणे

कुठे कराल रजिस्ट्रेशन?

  • सर्वप्रथम www.licindia.in या संकेतस्थळावर क्लिक करा.
  • जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर नवीन वापरकर्ते या पर्यायावर क्लिक करा.
  • सर्व तपशील समाविष्ट करा
  • www.licindia.in या साईटला भेट द्या. युझर आयडी पासवर्ड टाका.
  • ई-सेवा टॅबवर क्लिक करा आणि लॉग इन करा.
  • ई-सेवा वापरण्यासाठी पॉलिसींची नोंदणी करा
  • संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यावर तुम्हाला ई-मेल आणि SMS पाठवला जाईल. यानंतर तुम्ही ई-सेवांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठराल.
  • आता सबमिट बटणवर क्लिक करा.
  • बेसिक सर्व्हिसेसवर क्लिक करा त्यानंतर पॉलिसी जोडा या पर्याय निवडा.
  • आता तुमच्या सर्व पॉलिसींची नोंदणी करा.
  • ई-सेवांमुळे प्रवाशांना सर्व माहिती मिळवणे खूप सोयीचे होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.