LIC सरल पेन्शन योजना; आयुष्यभर दरमहा १२ हजार मिळवा

सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित जीवन जगण्यासाठी LIC विविध पॉलिसी ऑफर करते. भविष्याचे नियोजन करण्यासाठी LIC ने अशीच एक योजना सुरू केली आहे. एलआयसी सरल पेन्शन योजनेमध्ये मासिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना विशिष्ट रक्कम गुंतवावी लागते.

157

भविष्याचा विचार करून अनेक लोक विविध योजना, म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करतात. जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित जीवन जगण्यासाठी LIC विविध पॉलिसी ऑफर करते. भविष्याचे नियोजन करण्यासाठी LIC ने अशीच एक योजना सुरू केली आहे. एलआयसी सरल पेन्शन योजनेमध्ये मासिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना विशिष्ट रक्कम गुंतवावी लागते.

( हेही वाचा : महिलांसाठी LIC आधारशिला योजना! दररोज २९ रुपयांच्या बचतीमुळे तयार होईल ४ लाखांचा फंड)

एकदाच प्रिमियम भरून दरमहा निश्चित उत्पन्न मिळवू शकता

लोकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन LICने ही योजना १ जुलै २०२१ रोजी सुरू केली. या पॉलिसीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एकदाच प्रिमियम भरून दरमहा निश्चित उत्पन्न मिळवू शकता तसेच ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर तुम्ही केव्हाही कर्ज घेऊ शकता. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही स्वरूपात पॉलिसी खरेदी करू शकता.

वर्षभरात किमान १२ हजार रुपये पेन्शन

या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला वर्षभरात किमान १२ हजार रुपये पेन्शन मिळू शकते. या योजनेत तुम्हाला दरमहा किमान १ हजार रुपये जमा करावे लागतील. LIC सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी चार पर्याय आहेत. ग्राहक मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकतात. मासिक पेन्शन किमान १ हजार रुपये, त्रैमासिक पेन्शन किमान ३ हजार रुपये, सहामाही पेन्शन किमान ६ हजार रुपये आणि वार्षिक पेन्शन किमान १२ हजार रुपये असेल. याशिवाय तुम्ही ४० वर्षांत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला महिन्याला १२ हजारांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळेल.

पॉलिसीचे नियम 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे. यासोबत तुमचे वय ४० ते ८० वर्षे या दरम्यान असावे. तुम्ही जॉईंट लाईफ पॉलिसी घेतल्यास पती-पत्नी दोघांना पेन्शन मिळते. यानंतर नॉमिनीला पैसे मिळतात. पॉलिसी काढताना दोन पर्याय उपलब्ध असतात पहिल्या पर्यायाअंतर्गत पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते त्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला १०० टक्के विमा रक्कम दिली जाईल. दुसरा पर्याय म्हणजे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर पती/पत्नीला पेन्शन मिळेल यातील एखादा साथीदार नसेल तर दुसऱ्याला विमा रक्कम देण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.