सध्या मोबाईलचा अतिवापर सुरु आहे. आपण सगळेच जण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत. अशीच काहीशी परिस्थिती सध्या जगात सगळीकडे झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाईल वेडे झाले आहेत, असेच चित्र सगळीकडे पाहायला मिळते.
तुम्हाला माहिती आहे का की मोबाईलचा अतिवापर आणि मुख्यत: रात्री मोबाईलचा वापर केल्यामुळे तुम्हाला अंधत्व येऊ शकते. स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांना आणि त्वचेलाही हानी पोहोचते. एका संशोधनानुसार, फोन, लॅपटाॅप आणि टीव्हीच्या ब्राईट स्क्रीनमुळे युझरच्या डोळ्यांशिवाय त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तसेच, मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा ब्लू लाईट तुम्हाला अकाली वृद्ध बनवू शकतो.
( हेही वाचा: Whatsapp चॅट करा, पण online दिसू नका; जाणून घ्या सिक्रेट )
ब्लू लाईट आणि स्कीनचा संबंध
फोन, लॅपटाॅप आणि टीव्ही यांसारख्या इलेक्ट्राॅनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणारा ब्लू लाईट त्वचेच्या पेशींमध्ये अनेक बदल घडवून आणू शकतो. जसे की, त्वचेच्या पेशी कमी होऊ शकतात किंवा काही वेळा या पेशी नष्टही होऊ शकताता. हे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. पेशींमधील हे बदल तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारे बनवू शकतात.
संशोधनानुसार, जर तुम्ही एका तासापेक्षा जास्त काळ ब्लू लाईटच्या संपर्कात असाल तर ते तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये बदल करु लागते. त्यामुळे अनेक वेळा त्वचेवर काळे डागही पडतात. जास्त ब्लू लाईटच्या संपर्कात आल्याने डोळ्यांमध्ये लालसरपणा, सूज आणि कोरडेपणा येऊ शकतो.