देशभरात 5G सेवा लाॅंच झाली आहे. या लाॅंचिंगनंतर देशभरातील प्रमुख 13 शहरांमध्ये नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी तुमचा फोन 5G असणे आवश्यक आहे. यामुळे 4G Smartphone धारकांची पंचाईत झाली आहे. अशा 4G Smartphone धारकांनी 5G सेवा कशी अॅक्टीवेट करावी हे जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवा लाॅंच केली. पहिल्या टप्प्यात देशातील सर्व महानगरांसह 13 शहरांमध्ये लोकांना या सेवेचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरु, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर, अहमदनगर आणि जामनगरचा समावेश आहे, परंतु यासाठी तुमचा फोन 5G असणे आवश्यक आहे.
एअरटेलकडून या शहरात सेवा सुरु
1 ऑक्टोबरपासून एअरटेलची 5G सेवा निवडक शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे. एअरटेलने सध्या दिल्ली, वाराणसी, बेंगळुरु, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलीगुडी येथे 5G सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. मात्र, कंपनीने नेमके ठिकाण किंवा प्रदेश कुठे या सेवा उपलब्ध होतील हे सांगितलेले नाही.
( हेही वाचा: रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड करण्यासाठी ५१३ कोटींचा निधी )
5G सेवा कशी Activate कराल?
- तुमच्या Smartphone वर सेटिंग्ज अॅप उघडा
- कनेक्शनमध्ये जा किंवा मोबाईल नेटवर्क पर्याय पहा
- नेटवर्क मोडवर टॅप करा आणि 5G/4G/3G/2G पर्याय निवडा
- नेटवर्क मोड 5G वर सेट केल्यावर, तुम्ही 5Gच सक्रिय क्षेत्रात असाल तर, स्मार्टफोन आपोआप 5G लोगो दाखवण्यास सुरुवात करेल.
या सेटिंगनंतर तुमचा सध्याचा स्मार्टफोन 5G सेवेत सुरु होईल.
- 5G सेवा वापरु शकाल हे कसे जाणून घ्यावे ?
- Airtel Thanks अॅप वापरुन तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनसाठी 5G कंपॅटिबिलिटी तपासली जाऊ शकते.
- तुम्ही 5G सेवा उपलब्ध असलेल्या भागात राहिल्यास, तुम्ही चांगल्या स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकता.