गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे प्रमाण प्रंचड वाढले आहे. कोरोना काळात तर अनेकांसाठी हा फार मोठा आधार होता. लोकांची आवड काय आणि सर्वाधिक काय ऑर्डर केले जाते, असा प्रश्न सहज विचारला जातो. एका अहवालातून त्याचे उत्तर मिळाले आहे. लोकांनी बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली आहे. ऑनलाईन फूड ऑर्डर करणा-यांना बिर्याणी एवढी भावली की, मिनिटाला बिर्याणीला सर्वाधिक पंसती दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मसाला डोसा, फ्राईड राईस, पनीर बटर मसाला आणि समोसे यांचा क्रमांक लागला.
( हेही वाचा: देशातील सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्थानक; २८ अक्षरांचे स्पेलिंग वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य )
कोणते आईस्क्रीम आहे फेव्हरेट?
- आईस्क्रीममध्ये चोको चिप, अल्फांसो मॅंगो ( हापूस आंबा( व टेंडर कोकोनेट यांना सर्वाधिक पसंती.
- जपानी सुशी, मॅक्सिकन बाऊल, कोरियन स्पायसी रेमन व इटालियन पास्ता यांसारख्या विदेशी डिशेसच्या ऑर्डर्समध्ये तेजी आली. इटालियन डिश रैवियोली आणि कोरियाई डिश बिबिम्बॅप यांनाही भारतीयांना पसंती दिली आहे.
स्नॅक्समध्ये समोसा सर्वाधिक
समोसा हा सर्वाधिक ऑर्डर केलेला स्नॅक ठरला. याशिवाय पाव भाजी, फ्रेंच फ्राईज, गार्लिक ब्रेडस्टीक्स आदीं पदार्थही लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर केले.
Join Our WhatsApp Community