अशी अस्तित्वात आली ‘बुफे’ ची पद्धत

185

80 च्या दशकाच्या शेवटी लग्नातल्या पंगतीची जागा बुफेने घेतली. त्यानंतर ही पद्धत आणि शब्द चाांगलाच वापरात आला. पंगतीच्या जेवणाची गंमत वेगळीच होती, पण बुफेचे अनेक फायदे लक्षात आले. मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना मर्यादित मदतनिसांच्या मदतीने सर्व्ह करणे सोपे झाले, लोकांना सगळे पदार्थ एकत्र समोर मांडलेले दिसू लागले. त्यामुळे आपल्या आवडीनुसार, पदार्थ वाढून घेता येऊ लागले. समारंभाला येणारे आणि समारंभ आयोजित करणारे, दोन्हींसाठी बुफे फायदेशीर ठरला.

( हेही वाचा: दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणारे ‘हे’ ऐतिहासिक बेट माहितीय का? )

पण मुळात बुफे जेवण पद्धत आली कुठून?

  • बुफे हा शब्द फ्रेंच आहे. त्याचा उच्चार बफे असा आहे. बफे म्हणजे जेवणाचे पदार्थ मांडून ठेवता येतील, असे लाबंट टेबल. टेबलावर पदार्थ वाढून घ्यायचे ही पद्धत स्कॅंडेनेव्हियातल्या काही देशांत होती, पण फ्रेंच लोकांनी ख-या अर्थाने बुफे लोकप्रिय केला.
  • 18 व्या शतकात ब्रिटिशांनी आपल्या शेजा-यांकडून ही पद्धत आत्मसात केली. इंग्लंडमध्ये बुफेची शान काही औरच होती. 19 व्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये दोन प्रकारचा बुफे असे. पहिल्या प्रकारात दुपारी 1 वाजताचा लंच, ज्यात लोक आपल्या आवडीनुसार प्लेट भरुन टेबलाभोवती बसत आणि मग वेटर्स तुम्हाला वेगवेगळी पेये आणून देत.
  • अमेरिकेने पुढे ‘हवे तेवढे हवे ते खा’ ही संकल्पना काही रेस्टाॅरंट्समध्ये सुरु केली. अमेरिकेला एकूणच भरपूर प्रमाणात खाण्या- पिण्याचा नाद.  बुफे किंवा बफेला अमेरिकान लोकांनी लोकप्रिय केले, इतकेच नाही तर जगभरात पोहोचवले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.