घर खरेदी करताय? ‘या’ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा, रिसेलच्या वेळी होईल मोठा फायदा

151

आजकाल शहरांमध्ये सुरु असलेल्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचे स्वत:चे घर असावे असे स्वप्न असते. यासाठी सर्वप्रथम आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. घर किंवा जमिनीच्या किमती सहसा वाढतच असतात. अशा परिस्थितीत ही मालमत्ता खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

बिल्डर

फ्लॅट खरेदी करताना बिल्डर किंवा रिअल इस्टेट डेव्हलपरची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही मालमत्ता खरेदी करताना हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे घर खरेदी करताना नेहमी नामांकित बिल्डरकडे जा. बिल्डरचा ट्रॅक रेकाॅर्ड तपासा.

प्राॅपर्टीचे लोकेशन

कोणत्याही मालमत्तेची किंमत वाढवण्यात किंवा कमी करण्यात लोकेशनची मोठी भूमिका असते. जर तुम्ही रिटर्नच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करत असाल तर अशा ठिकाणी करा जिकडे डेव्हलपमेंट होत आहे. हे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न मिळवून देण्यास मदतशील राहील.

( हेही वाचा: IRCTC चे चारधाम यात्रा टूर पॅकेज! फक्त ५१ हजारात १० धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी )

रेरामध्ये नोंदणी

घर खरेदी करताना बिल्डरने रेरा ( रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथाॅरिटी) मध्ये नोंदणी केली आहे की नाही याची खात्री करा. RERA मध्ये नोंदणीकृत नसल्यास घर खरेदी करणे टाळा.

पब्लिक ट्रान्सपोर्ट

घर खरेदी करताना, तुमच्या घरापासून सार्वजनिक वाहतुकीचे अंतरदेखील लक्षात ठेवा. जर कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर प्राॅपर्टीचे दर वाढतील. म्हणूनच अशा ठिकाणी घर खरेदी करा जिथे तुम्हाला प्रवास करणे सोपे होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही नंतर मालमत्ता विकल्यास तुम्हाला चांगले पैसे मिळतील.

सुविधा

मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी ती रुग्णालये, शाळा ,उद्याने, शाॅपिंग काॅम्लेक्स यापासून किती दूर आहे ते पहा. हे सर्व तुम्हाला उच्च परतावा मिळवण्यात मदत करतील. या सुविधा तिथे नसतील तर निदान भविष्यात तरी त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे का ते पाहा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.