डेबिट आणि क्रेडिट कार्ड हॅक झाले तर काय कराल?

118

Debit And Credit Card Hack: डेबिट आणि क्रेडिट कार्ड चोरीला जाणे, हरवणे किंवा चक्क हॅक होणे, हे आता प्रवासात असताना आपले पाकीट सहज मारले जाण्याइतके सोपे झाले आहे. हल्ली तर कार्ड हरवण्याचीही गरज नसते. एखादी लिंक पाठवून ती क्लीक करायला सांगून दूरुन बसलेले सायबर गुन्हेगार तुमचे कार्ड हॅक करु शकतात.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हॅक झाले तर काय करायचे?

मोबाईल पाहा, स्टेटमेंट तपासा

हल्ली आपण कार्डवरुन करत असलेल्या सर्व व्यवहारांचे मोबईलवर मेसेज येतात. मात्र, अनेकदा ते आपण उघडूनही पाहत नाही. त्यामुळे किती पैसे खात्यातून गेले हे कळत नाही. तसे न करता कायम आपले अकाऊंट स्टेटमेंट तातडीने तपासा. तुम्हाला पन्नास- शंभर रुपयांच्या व्यवहारांविषयीही तक्रार असेल तर त्याविषयी बॅंकेला विचारा, पैसे कुठे खर्च झाले, हे शोधा.

( हेही वाचा: सरकारचा मोठा निर्णय; भारतात VLC Media Player अ‍ॅप सरकारकडून बॅन )

तक्रार करा

काही गैरव्यवहार दिसला तर तातडीने बॅंकेकडे, कार्ड प्रोव्हाइडरकडे तक्रार करा. आपले डेबिट/ क्रेडिट कार्ड हरवले, गहाळ झाले तर ते तातडीने ब्लाॅक करणे गरजेचे आहे. पीन बदला. बॅंकेकडे कार्ड बदलून मागा. टोल फ्री नंबरवर तातडीने तक्रार करा. त्यासाठी तुम्हाला कार्डाचा नंबर तुमच्याकडे अन्यत्र कुठेतरी लिहून ठेवावा लागेल. तसेच, बॅंकेचा कस्टमर केअर नंबरही आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

तक्रार लेखीच हवी

कार्डावर झालेल्या गैरव्यवहाराबाबत बॅंकेकडे जी तक्रार कराल ती लिखितच करा. सगळ्याचे पुरावे जोडा. फोन केले तर तारखा, वेळा लिहू ठेवा. काॅल रेकाॅर्डिंगही जपून ठेवा. जास्तीत जास्त 10 कमीत कमी 3 दिवसांत बॅंकेने तुमचा प्रश्न सोडवला पाहिजे.

पोलिसांत तक्रार

पोलिसातही तक्रार करा. त्याचे पुरावे तुमच्याकडे ठेवा. सायबर पोलिसांना सहकार्य करा आणि तपासून पाहा की आपण चुकून कधी फोन, ई-मेलवर आपला कार्ड नंबर, ओटीपी, आधार कार्ड देत नाही ना? ते देणे टाळा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.