Lifestyle : पस्तीशीनंतर महिलांनी आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश, चिरतरुण राहण्यासाठी होईल मदत

समतोल आहाराचा करा समावेश

169
Lifestyle : पस्तीशीनंतर महिलांनी आहारात करावा 'या' पदार्थांचा समावेश, चिरतरुण राहण्यासाठी होईल मदत
Lifestyle : पस्तीशीनंतर महिलांनी आहारात करावा 'या' पदार्थांचा समावेश, चिरतरुण राहण्यासाठी होईल मदत

शरीर निरोगी आणि चिरतरुण राहण्यासाठी दैनंदिन जीवशैलीत बदल करण्याची आवश्यकता आहे, त्याप्रमाणेच समतोल आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा आहारात समावेस करणंही आवश्यक आहे. जसे वय वाढू लागते तसे शारीरिक गरजांमध्येही बदल होऊ लागतात. तिशीनंतर कोणताही अन्नपदार्थ खाणे, खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे असे केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या वयात हेल्दी इटिंग हॅबिट्स (खाण्यापिण्याच्या आरोग्यदायी सवयी) स्वत:ला लावून घेतल्यास वाढत्या वयातही तुम्ही चिरतरुण दिसू शकता तसेच शरीरयष्टीही उत्तम राहायला मदत होऊ शकते.

– वर्किंग लाईफस्टाईलमुळे तिशीनंतर अतिमसालेदार, तळलेले तेलकट खाद्यपदार्थ खाण्याची सवय वाढू शकते.ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ खाऊ नयेत.

– बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. त्याऐवजी घरी बनवलेले अन्नपदार्थ खावेत. घरी तयार केलेल्या पदार्थांमध्ये पोषणमूल्ये जास्त प्रमाणात असतात शिवाय हे पदार्थ पौष्टिक असतात. यामध्ये फळे, पालेभाज्या, अंडी , दूध, सुकामेवा, विविध प्रकारच्या डाळी यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

– तिशी ते चाळीशीच्या महिलांनी आपल्या नियमित आहारात सर्व प्रकारच्या पोषक मूल्यांचा समावेश करता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे, मिनरल आणि फायबर या घटकांचा समावेश असलेले अन्नपदार्थ ग्रहण करावेत. विविध प्रकारच्या बिया, धान्ये यांचा समावेश करावा.

– दररोज व्यायाम, ध्यानधारणा, योगासने करावीत.काही जणांना व्यायाम आणि योगासने करण्याची सवय नसते. त्यामुळे आपल्या नियमित सवयींमध्ये ही सवय लावून घेणे गरजेचे आहे.

– तिशीनंतर शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ शकतात. या वयात स्नायू आणि हाडे बळकट असणे तसेच वजनवाढीवर नियंत्रण राहणे आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

– सिगरेट, दारू यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहिल्यास आजारांचा धोका कमी होतो.

टीप – प्रकृतीप्रमाणे घ्यायच्या योग्य आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.