Lifestyle : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरीच बनवा ‘हा’ पदार्थ, वाचा सोपी रेसिपी

129
Lifestyle : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरीच बनवा 'हा' पदार्थ, वाचा सोपी रेसिपी
Lifestyle : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरीच बनवा 'हा' पदार्थ, वाचा सोपी रेसिपी

दिवाळी सणानिमित्त दररोज देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी एखादा गोड पदार्थ करण्याचा विचार करत असाल, तर काजू कतलीचा नैवेद्य दाखवू शकता. (Lifestyle) पारंपरिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे.

काजू कतली (Kaju Katali) रेसिपी अतिशय सोपी असून घरच्या घरी ती बनवता येऊ शकते. याकरिता कोणत्या साहित्याची आवश्यकता असते आणि बनवण्याची पद्धत जाणून घेऊया –

काजू कतली बनवण्यासाठी साहित्य

काजू – २ वाटी, साखर – १ वाटी (चवीनुसार),
गाईच तूप – ४ चमचे, वेलची पावडर – १/२ चमचे

बनवण्याची पद्धत –
सर्वप्रथम काजूचे काप करून घ्या आणि सर्व काजू मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. यानंतर, काजू पावडर चाळणीत टाकून चाळून घ्या. जेणेकरून काजूचे जाड तुकडे यात राहणार नाही. हे जाड तुकडे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून चाळून त्या पावडर मध्ये मिक्स करा. त्यानंतर एका पातेल्यात साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. काही वेळाने साखर पाण्यात चांगली मिसळली की त्यात काजू पावडर घालून मिक्स करा आणि गॅस बारीक करा. हे काजूचे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यात मिश्रणात वेलची पावडर आणि तूप घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा. आता एक प्लेट किंवा ट्रे घ्या आणि त्याच्या तळाशी तूप चांगले लावा. आणि तयार केलेली पेस्ट प्लेटमध्ये ठेवा आणि ती फिरवत राहा जेणेकरून पेस्ट लवकर थंड होईल. पेस्ट थोडी गरम राहिली की बटर पेपरवर थोडं तूप लावून घ्या. या सारणाचे हाताने मोठे मोठे गोळे करून बटर पेपर वर पसरवून घ्या तुम्ही यासाठी लाटण्याचीही मदत घेऊन शकतात. त्यानंतर सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. काजू कतलीचे मिश्रण सेट झाल्यानंतर चाकूच्या मदतीने हिऱ्याच्या आकारात कापून घ्या. झाली तयार स्वादिष्ट काजू कतली घरच्या घरी !

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.