मुलाखतीला जाताय? तुमच्या Resume मध्ये ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात

141

जेव्हा नोकरी शोधण्यासाठी Resume तयार केला जातो. त्यावेळी काही विशिष्ट पद्धत फाॅलो करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचा Resume इतरांपेक्षा वेगळा ठरतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नोकरी करा. मुलाखतीला मात्र तुमचा Resume जर आकर्षक नसला, तर त्याचा परिणाम तुमच्या मुलाखतीवर पडू शकतो. Resume हा तुमच्या मुलाखतीच्या प्रक्रियेतलाच एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणूनच, तुमचा Resume अधिक आकर्षक होण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.

  • तुमचा Resume समोरच्या व्यक्तीने का वाचावा हे वाचकाला लगेच कळायला हवे. शीर्षकात तुम्ही कोण आहात आणि तुमच्या कामाची नेमकी ओळख काय याची स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या क्षेत्रांत आतापर्यंत काम केले आहे. त्या कामाची ओळख पटवून देणारे विशेष पुरावे तुमच्या Resume मध्ये असू द्या. म्हणजेच लिंक, फोटो, काॅन्टेंट, व्हिडीओ इत्यादी, थोडक्यात तुमच्या आतापर्यंतच्या Achievements चा उल्लेख असू द्या.

( हेही वाचा: रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मिळणार या विविध सुविधा )

  • अनेक गोष्टी करायला आवडत असल्या तरी ठराविक तीन विशेष क्षेत्र अशी निवडा की ज्यामध्ये तुम्हाला मनापासून काम करायला आवडेल. यामुळे तुमचा उद्देश स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. तसेच, तुम्ही कोणती कामे करु शकता. कोणत्या जबाबदा-या पार पाडू शकता याचा देखील उल्लेख तुमच्या Resume मध्ये असणे गरजेचे आहे. तुमची Strength सांगणे गरजेचे आहे.
  • मुलाखत घेणा-याला व्यवस्थित वाचता येईल असा फाॅन्ट वापरा आणि तोच संपूर्ण Resume मध्ये असू द्या. सतत फाॅन्ट बदलत राहिल्याने मुलाखतकार गोंधळात पडण्याची शक्यता असते.
  • तुम्ही कितीही कामे केलेली असतील, परंतु तुमचा Resume हा दोन पानांपेक्षा जास्त नसावा. यामुळे समोरच्या व्यक्तीला ठराविक काळानंतर तो वाचायचा कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे तो सोपा आणि सुटसुटीत असावा.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे Resume मध्ये चुका टाळाव्यात. यामुळे तुमच्या एकंदर कौशल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.