तिखट, गोड कोणत्याही पदार्थाचा सुगंध आणि चव वाढण्यासाठी त्यामध्ये वेलचीचा वापर केला जातो. वेलची हा गरम मसाल्यांमधला एक पदार्थ असून तो माउथ फ्रेशनर म्हणूनही वापरतात. वेलचीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत,कारण तिच्यात अनेक पोषक तत्त्वे आहेत. मात्र हे फारच कमी जणांना माहित असेल की वेलचीची सालीचाही विविध पद्धतीने वापर करता येऊ शकतो. वाचा – वेलचीच्या सालीचे फायदे
(हेही वाचा – Neymar Al Hilal Deal : सौदी क्लबने नेमारला दिलं २५ बेडरुमचं घर आणि खाजगी वापरासाठी जेट)
– वेलचीच्या सालीमध्ये हिंग, धनिया, काळे मीठ, ओवा हे पदार्थ मिसळून खाऊ शकता. यामुळे पचनाच्या तक्रारी दूर होतात शिवाय पोटाच्या विविध विकारांवर वेलचीची साल गुणकारी आहे.
– अपचन, मळमळल्यासारखे वाटणे असे त्रास होत असल्यासही वेलचीची साल फायदेशीर ठरते.
– जावित्रीच्या चुर्णात वेलचीची साल आणि साखर मिसळून खाल्ली तर मळमळणे, उलटीसारखे वाटणे यासारख्या तक्रारी दूर होतात.
टीप – वेलचीच्या सालीचा वापर औषधाप्रमाणे करायचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community