Lily Flower : लिलीच्या फुलाचे रोपटे कसे लावाल आणि काळजी कशी घ्याल?

104
Lily Flower : लिलीच्या फुलाचे रोपटे कसे लावाल आणि काळजी कशी घ्याल?

लिली हे फुल सर्वंनाच खूप आवडते! बल्बपासून उगवलेले, लिली ही बारमाही फुलते. योग्यरित्या लागवड केल्यास कमीतकमी काळजी घेऊनही ही फुले आपल्या बागेची शोभा वाढवतात. लिलीच्या फुलांचे वैज्ञानिक नाव लिलियम असे आहे. लिलीची फुले ही दिसायला सुंदर असल्यामुळे तुमच्या घराची शोभा वाढवतात. (Lily Flower)

लिलीची फुले जगभर आढळतात. भारत, कॅनडा, अमेरिका, जपान यांसारख्या देशांमध्ये ती मुबलक प्रमाणात आढळतात. विशेषतः युरोपियन खंडातील लोक बागेत किंवा घराच्या सजावटीसाठी ही फुले लावतात. लिली फुलांच्या अनेक प्रजाती जगभर आढळतात. त्यात १०० हून अधिक जाती आढळतात. ही फुले लाल, पिवळी, पांढरी, गुलाबी, केशरी रंगात उपलब्ध असतात. त्याच्या मुख्य प्रजातींमध्ये पांढरी लिली, टायगर लिली, इस्टर लिली इत्यादींचा समावेश होतो. (Lily Flower)

लिलीचे रोप बल्बपासून विकसित होते. लिलीचे एक देठ असते, जे जमिनीत पुरले जाते. अशा प्रकारे या वनस्पतीचा विकास होतो. लिलीच्या बिया देखील असतात. लिलीचे रोप लावण्यास सोपे असल्यामुळे तुम्ही घरासमोर किंवा अगदी टेरेसवरही याची लागवड करु शकता. (Lily Flower)

(हेही वाचा – Devendra Fadnavis: लोकसभेत मताधिक्य घटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, म्हणाले…)

आयुर्वेदातही लिलीच्या फुलांचा वापर 

लिलीचे रोप सुमारे ६ फूट उंच वाढते. मात्र रोपांच्या काही प्रजाती फक्त २ फुटांपर्यंत वाढतात. या फुलांच्या रोपाची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. खत आणि पाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम. होय! रोप व झाडांवरही आपण प्रेम केलं पाहिजे. प्रेमाने फुलं बहरतात. लिलीच्या रोपाचा जीवनकाल २ वर्षांचा असतो. लिलीचे रोप अशा ठिकाणी लावावे, जिथे थेट सूर्यप्रकाश येत असेल. लिलीचे बल्ब सुकण्याआधीच रोपण केले पाहिजे. जेणेकरुन रोप चांगले वाढू शकेल. (Lily Flower)

लिलीच्या फुलातून तेलही निघते. कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी हे तेल वापरले जाते. आयुर्वेदातही या फुलाचा वापर केला जातो. लिली हा एक नैसर्गिक सुगंध आहे जो तणाव कमी करतो. मात्र केवळ टायगर लिली आणि व्हाईट लिलीची फुले सुगंधित असतात. खासकरुन वसंत ऋतूमध्ये हे फुले फुलू लागतात. त्यामुळे दिसायला सुंदर आणि बहुगुणी असे लिलीचे रोप आपल्या अंगणात किंवा टेरेसवर नक्की लावा. (Lily Flower)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.