lingampally railway station : लिंगमपल्ली रेल्वे स्टेशन वरून कोणकोणत्या ट्रेन्स सुटतात?

112
lingampally railway station : लिंगमपल्ली रेल्वे स्टेशन वरून कोणकोणत्या ट्रेन्स सुटतात?
कुठे आहे लिंगमपल्ली रेल्वे स्टेशन?

लिंगमपल्ली रेल्वे स्टेशन हे तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील एक रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाजवळ बीएचईएल टाऊनशिप आणि हैदराबाद विद्यापीठ येथे सहज जाता येतं. हैदराबाद आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून सुटणाऱ्या किंवा जाणाऱ्या इतर एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या या स्थानकावर येऊन थांबतात. (lingampally railway station)

कोणकोणत्या सुविधा प्राप्त करुन दिल्या जातात?

लिंगमपल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्मवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम उपलब्ध आहे. जेणेवतून तुम्हाला कधी पैशांची अडचण येणार नाही. तुम्हाला आराम करण्यासाठी रिटायरिंग रुम्सची सेवा देखील पुरवली जाते. त्याचबरोबर सशुल्क पार्किंग सुविधाही स्टेशन बाहेर उपलब्ध आहे. मात्र लिंगमपल्ली रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर लगेज स्कॅनिंग सुविधा उपलब्ध नाही. (lingampally railway station)

लिंगमपल्ली रेल्वे स्थानकावरुन कोणकोणत्या ट्रेन्स सुटतात?

लिंगमपल्ली हे हैदराबादमधील एक महत्वाचे स्थानक असल्यामुळे हैदराबाद आणि सिकंदराबाद येथून सुटणाऱ्या किंवा जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्या लिंगमपल्ली येथे थांबतात. आम्ही तुम्हाला काही विशेष ट्रेन्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्हाला प्रवास सुखकर होण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या ट्रेन्सची माहिती अवश्य वाचा : (lingampally railway station)

(हेही वाचा – Pune Rain : पुण्यातील सोसायट्यांमध्ये का चालवाव्या लागल्या बोटी ? Ajit Pawar म्हणाले…)

गौतमी एक्सप्रेस :

लिंगमपल्ली ते काकीनाडा बंदर असा प्रवास ही ट्रेन करते.

कोकानाडा एक्सप्रेस :

लिंगमपल्ली ते काकीनाडा शहर दरम्यान ही ट्रेन धावते.

इंटरसिटी एक्सप्रेस :

लिंगमपल्ली आणि विजयवाडा एवढा प्रवास इंटरसिटी एक्सप्रेस पार करते.

जन्मभूमी एक्स्प्रेस :

लिंगमपल्ली ते विशाखापट्टणम दरम्यान धावते.

नारायणाद्री एक्सप्रेस :

लिंगमपल्ली ते तिरुपती असा प्रवास ही ट्रेन करत असल्यामुळे विशेषतः तिरुपतीला दर्शनाला जाणार्‍या भक्तांसाठी ही उत्तम सोय आहे.

देवगिरी एक्सप्रेस :

लिंगमपल्ली ते मुंबई सीएसएमटी दरम्यान ही ट्रेन धावते. त्यामुळे लिंगलपल्लीवरुन मुंबईला येणार्‍या प्रवाशांना याद्वारे उत्तम प्रवासी सेवा प्रदान केली जाते.

हमसफर एक्सप्रेस :

लिंगमपल्ली आणि इंदूर जंक्शन दरम्यान अगदी हमसफर म्हणजे मैत्रीपूर्ण वातावरणात ही ट्रेन धावते. (lingampally railway station)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.