आता LinkedIn हिंदी भाषेतही, नोकरी शोधणं होणार आणखी सोपं!

126

सोशल मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सच्या जाळ्यात स्वत:चं वेगळेपण टिकवून ठेवणारी कोणती वेबसाइट असेल तर ती म्हणजे लिंक्डइन. लिंक्डइन हे वेब पोर्टल सोशल नेटवर्किंग या वर्गात मोडत असलं तरी उद्योगधंद्यांमधील व्यावसायिक भेटीगाठींपुरतंच ते मर्यादित आहे. हे लिंक्डइन वापरणाऱ्या भारतीय युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता लिंक्डइनवर तुम्हाला हिंदी भाषेच्या माध्यमातून नोकरी शोधता येणार आहे. जागतिक स्तरावरील 25 भाषांमध्ये उपलब्ध असून त्यात आता भारताची राष्ट्रभाषा हिंदीचा समावेश करण्यात आला आहे.

हिंदी भाषिकांना दिलासा

या नव्या बदलामुळे लिंक्डइनवर हिंदी भाषेत जगातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्कींग प्लॅटफॉर्मवर हिंदी भाषेत माहिती मिळवता आणि शेअर करता येणं अधिक सोयिस्कर होणार आहे. भारतात साधारण 60 कोटी हिंदी भाषिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण कंपनीनं आज LinkedIn वर हिंदी ही पहिली भारतीय प्रादेशिक भाषा लाँच केल्याचे सांगितले आहे.

या डिव्हाईसमध्ये हिंदीचा वापर करता येणार

आजपासून लिंक्डइनने पहिल्या टप्याला सुरु केला आहे. यामध्ये युजर्सला नोकरी, फीड, प्रोफाईल आणि मेसेज हिंदीमध्ये पाठवता येणार आहे. याद्वारे तुम्हाला डेस्कटॉप, अँड्रॉईड मोबाईल आणि आयफोनमध्ये हिंदी भाषेचा वापर करता येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये, लिंक्डइन जास्तीत जास्त बँकिंग आणि सरकारी नोकऱ्यांसह उद्योगांमध्ये हिंदी भाषिक व्यावसायिकांसाठी उपलब्ध नोकऱ्यांच्या संधीची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

असा निवडा हिंदीचा पर्याय

  • लिंक्डइन मोबाईल अॅपमध्ये हिंदी भाषेचा वापर करण्यासाठी फोन सेटिंग्समध्ये जा
  • आवडत्या भाषेसाठी हिंदी भाषेचा पर्याय निवडा
  • ज्या युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये हिंदी भाषेचा पर्याय आधीच निवडलेला असेल, त्यांच्या स्मार्टफोनवर लिंक्डइनचा आपोआप हिंदीमध्ये उपलब्ध होईल.
  • डेस्कटॉपवर, लिंक्डइन वापरणाऱ्यासाठी लिंक्डइन होमपेजच्या सुरुवातीला ‘मी’ चिन्हावर क्लिक करा. त्यानंतर ‘सेटिंग्ज अँड प्रायव्हसी’ पर्याय निवडा.
  • डाव्या बाजूला ‘अकाऊंट्स प्रिफरेंसेस’ मध्ये ‘साईट प्रिफरेंसेस’ ऑपशन सिलेक्ट करा.
  • ‘लँग्वेज’ आणि पुढे ‘चेंज’वर क्लिक करत हिंदी भाषेचा पर्याय सिलेक्ट करा
  • यानंतर तुम्हांला लिंक्डइनवर हिंदी भाषेचा वापर करता येईल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.