Loco Pilot Salary : रेल्वेतील लोको पायलटचं मासिक वेतन नेमकं किती असतं?

Loco Pilot Salary : रेल्वे गाडी चालवणाऱ्या चालकाला लोको पायलट म्हणतात.

55
Loco Pilot Salary : रेल्वेतील लोको पायलटचं मासिक वेतन नेमकं किती असतं?
  • ऋजुता लुकतुके

ट्रेन चालवणारा मोटरमन व्हायचं हे लहानपणी अनेक मुलांचं स्वप्न असतं. पण, हे काम तितकंसं सोपं नाही. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये वेळी अवेळी जागं राहून हे काम करावं लागतं. त्यामुळे दक्षता हा यातील सगळ्यात मोठा गुण आहे. पण, ज्यांना आव्हानात्मक कामं आवडतात त्यांच्यासाठी मात्र लोको पायलट होणं हे कसब आणि कौशल्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. लोको पायलट होण्यासाठी तुम्ही आयटीआयमधील पदविका अभ्यासक्रम तरी पूर्ण करावा लागतो. किंवा पद्धतशीर अभियांत्रिकी प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्याच्या बरोबरीने भारतीय रेल्वेसाठी घेतली जाणारी आरआरबी परीक्षाही तुम्हाला उत्तीर्ण करावी लागते. (Loco Pilot Salary)

लोको पायलटची सुरुवातीची मासिक मिळकत २.५ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. पण, तुम्ही अभियांत्रिकी पदवी घेतली असेल तर हीच सुरुवात ६.५ लाख वार्षिक इतका पगार तुम्हाला मिळतो. एका विशिष्ट रेल्वे मार्गावर लोको पायलट काम करतो. रेल्वे व्यवस्थापक हा त्याचा रिपोर्टिंग अधिकारी असतो. रेल्वे गाडीचा मार्ग, वेग, लागणारे सिग्नल, गाडीतील इंधन आणि एकूणच गाडीची देखभाल तसंच प्रवाशांची सुरक्षितता यांची जबाबदारी लोको पायलटची असते. (Loco Pilot Salary)

(हेही वाचा – Maha Vikas Aghadi ला मोठा धक्का; अबु आझमींनी शिवसेना उबाठामुळे मविआतून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय)

वर सांगितल्याप्रमाणे तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय यावर तुमचा सुरुवातीचा पगार ठरतो. पण, अनुभव आणि शिक्षण धरून सगळ्याची सरासरी काढली तर भारतात लोको पायलट सरासरी ७ ते ९ लाख रुपये वार्षिक मिळवतात आणि तुमच्या अनुभवानुसार हा पगार वाढत जाते. (Loco Pilot Salary)

भारतीय रेल्वेतील लोको पायलटला सरासरी वार्षिक ६ लाख रुपये मिळतात. तर मेट्रो आणि लोकल चालवणाऱ्या लोको पायलटला सरासरी ३ ते ४ लाख रुपये वार्षिक मिळतात. भारतीय रेल्वेतील लोको पायलटला सुरुवातीला मिळणाऱ्या पगाराची फोड बघूया, (Loco Pilot Salary)

(हेही वाचा – Maharashtra Legislature Special Session 2024 : विरोधी पक्षांचे आमदार शपथ घेणार नाहीत; नेमकं कारण काय?)

New Project 2024 12 07T135751.924

१५ ते २० वर्षं अनुभवी लोको पायलट भारतात १० ते १५ लाख वार्षिक पगारही मिळवू शकतात. (Loco Pilot Salary)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.