लोको पायलट (Loco Pilot) म्हणजेच लोकोमोटिव्ह पायलट. तुम्ही विमानाचा पायलट ऐकला असेल पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा लोको पायलट कोण असतो? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. ट्रेन चालवणार्याला कोलो पायलट म्हटलं जातं. ट्रेन सुरु करणे, थांबवणे, वेग नियंत्रित करणे. ट्रेन वेळेवर सुरु आहे व सिग्नल पाळत आहे, याची खात्री करणे अशा प्रकारची कामे या लोको पायलटला करावी लागतात. प्रवासी आणि वस्तूंच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीमध्ये लोको पायलट महत्त्वाची भूमिका बजावतात.
(हेही वाचा – संगीत जगलेला माणूस : Pandit Vishnu Narayan Bhatkhande)
जबाबदारी :
- ट्रेनचे यांत्रिक संचालन, वेग आणि दिशा व्यवस्थापित करणे.
- सर्व सुरक्षा नियमांचे आणि शिष्टाचाराचे पालन करणे.
- लोकोमोटिव्ह आणि त्याच्या उपकरणांची तपासणी आणि देखभाल.
- इतर रेल्वे प्राधिकरणांशी समन्वय साधणे आणि सिग्नलचे निरीक्षण करणे.
(हेही वाचा – Drugs : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून ५ हजार ५०० किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट)
शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण आणि भरती :
संबंधित क्षेत्रातील आयटीआय किंवा डिप्लोमाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. इच्छुक लोको पायलट सहाय्यक म्हणून कामाला सुरुवात करतात आणि वरिष्ठ पदांवर पदोन्नती होण्यापूर्वी व्यवस्थित व व्यापक प्रशिक्षण घेतात. सहाय्यक लोको पायलट म्हणून भरती होता येते. अनुभव आणि अतिरिक्त प्रशिक्षण घेतल्यावर वरिष्ठ लोको पायलट (Loco Pilot) पदावर बढती मिळू शकते.
लोको पायलटचा पगार :
असिस्टंट लोको पायलटला (Loco Pilot) सुमारे दरमहा १९००० ते २५००० पगार मिळतो. अनुभवी लोको पायलटच्या बाबतीत, लोको पायलट (मेल/एक्सप्रेस): दरमहा ४५००० ते ६००००, लोको पायलट (वस्तू): दरमहा २२००० ते ४००००, लोको पायलट (पॅसेंजर): दरमहा १५००० ते २८०००, शंटिंग लोको पायलट: दरमहा ५०००० ते ७००००. महत्त्वपूर्ण अनुभव आणि कौशल्यांसह, एक लोको पायलट दरमहा ७५००० पर्यंत कमवू शकतो. तसेच लोको पायलट यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता यासह विविध भत्ते आणि फायदे देखील मिळतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community