लोकनाथ मंदिर हे पूरी इथलं एक पवित्र देवस्थान आहे. हे देवस्थान भगवान जगन्नाथ मंदिरापासून फक्त २ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हे ओडिसातल्या सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे महादेवांचं मंदिर आहे. ओडिशा येथे अगदी प्राचीन काळापासून शैव पंथीय लोकांकडून महादेवांची उपासना केली जाते. (loknath temple)
या मंदिराचा एक मनोरंजक पैलू म्हणजे इथे सर्वात आतल्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. हे शिवलिंग वर्षातून फक्त एकदाच दिसतं. यामागचं कारण असं की, शिवलिंग असलेला संपूर्ण गाभारा वर्षभर नैसर्गिक झऱ्याने पाण्याने भरलेला असतो. फक्त पंकोडधर एकादशीच्या रात्री, महाशिवरात्री उत्सवाच्या तीन दिवस अगोदर या गाभाऱ्यातलं सगळं पाणी बाहेर काढलं जातं तेव्हा शिवलिंगाचं दर्शन होते. महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान हजारो भाविक भक्त शिवलिंगाची पूजा करण्यासाठी या मंदिरात गर्दी करतात. (loknath temple)
शिवलिंग वर्षभरात फक्त एकदाच दिसत असलं तरीही भाविक भक्त वर्षभर इथे फुलं, भुंग्या आणि बिल्वाची पानं, मध, चंदन, फुलं, दूध, शहाळ्याचं पाणी आणि दही अर्पण करतात. गाभाऱ्यातलं नैसर्गिक झऱ्याचं आणि शिवलिंगाला अर्पण केलेल्या गोष्टींचं विघटन होतं. इथल्या स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार या कुजलेल्या मिश्रणाला एक विशेष सत्व असून त्याला एक औषधी मूल्य प्राप्त झालं आहे. जी कोणी व्यक्ती हे पाणी पिते तिचे सर्व असाध्य रोग बरे होतात. (loknath temple)
(हेही वाचा – bca salary : बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सच्या पदवी धारकांना किती वेतन मिळतं?)
लोकनाथ मंदिर, पूरी इथला इतिहास
पौराणिक कथांनुसार जेव्हा भगवान श्रीराम माता सीतेला सोडवण्यासाठी लंकेला जात होते, तेव्हा त्यांनी पूरी येथे थांबून भगवान महादेवांचं दर्शन घेण्याचं व्रत घेतलं. त्यादरम्यान, सबरापल्ली या इथून जवळ असलेल्या गावातल्या सबरस नावाच्या माणसाने भगवान रामाला शिवलिंगासारखा आकार असलेला एक भोपळा दिला. स्थानिक भाषेत भोपळ्याला लाऊ किंवा लौका म्हणतात. तेव्हा भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची प्रतिकृती म्हणून या भोपळ्याची स्थापना केली आणि माता सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवांकडे प्रार्थना केली. तेव्हापासून हे शिवलिंग ‘लौकनाथ’ म्हणून ओळखलं जातं. पुढे शतकानुशतकं ‘लौकनाथ’ या नावाचा अपभ्रंश होऊन ‘लोकनाथ’ झालं आहे. (loknath temple)
या मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान हजारो भाविक भक्त महादेवांची उपासना करण्यासाठी या मंदिरात येतात. या मंदिरात साजरा केला जाणारा आणखी एक उत्सव म्हणजे सरंती सोमवार मेळा होय. या मेळ्याच्या दरम्यान लोकनाथाची मूर्ती जगन्नाथ मंदिरात नेली जाते. कारण लोकनाथ हे भगवान जगन्नाथाच्या खजिन्याचे संरक्षक देवता आहेत असं मानलं जातं. (loknath temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community