नोकरी शोधताना आपल्याकडे अपडेटेड बायोडेटा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. बायोडेटा प्रभावी हवा असल्यास बायोडेटामध्ये अनावश्यक गोष्टी लिहिणे प्रकर्षाने टाळायला हवे. तुम्ही तुमच्या बायोडेटामध्ये काय लिहू नये अशा गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया…
( हेही वाचा : Post Office Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती; ९८ हजार जागा रिक्त, येथे करा अर्ज)
कालबाह्य अभ्यासक्रमाविषयी लिहू नका
तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्या बायोडेटामध्ये मॅट्रिकविषयी उल्लेख करू नका असे अभ्यासक्रम लिहिण्याची गरज नसते. कालबाह्य अभ्यासक्रम प्राथमिक पातळीवरचे असतात त्यामुळे तुम्ही उच्च शिक्षित असल्यास प्राथमिक अभ्यासक्रम मेन्शन करून उपयोग नाही.
बायोडेटा प्रभावी असावा, अनावश्यक डेटा नकोच…
तुमच्या बायोडेटामध्ये ढीगभर अनावश्यक माहिती लिहू नका उदाहरणार्थ आपण केलेल्या कामाचे वर्णन म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन लिहिणे टाळावे. अनावश्यक माहिती वाचायला मुलाखतकर्त्यांना वेळ नसतो. त्यामुळे तुमचा बायोडेटा कमीत कमी आणि माहितीयुक्त असावा.
नोकरीची गरज का आहे हे लिहणं टाळा
बरेचजण आपल्या बायोडेटामध्ये नोकरीची गरज का आहे हे लिहितात परंतु हे लिहिण्याची अजिबातच गरज नाही तसेच मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ते लिहू नका.
स्वस्तुती लिहिणे टाळा
बायोडेटामध्ये स्वत:चे कौतुक करणे टाळा त्यामुळे मुलाखतकर्त्यांच्या मनात तुमची वेगळी प्रतिमा निर्माण होऊ शकते.
Join Our WhatsApp Community