lord krishna quotes : जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांचे दिव्य संदेश

155
lord krishna quotes : जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांचे दिव्य संदेश

सबंध विश्वाला भगवद्गीतेच्या माध्यमातून ज्ञानामृत पाजणारे भगवान कृष्ण खरोखरच अद्वितीय आहेत. मनुष्य जातीत जन्माला येऊन आपले मनुष्यपण टिकून त्यांनी जगाच्या कल्याणाहेतू कार्य केलं. महाभारतासारख्या भीषण युद्धात अर्जूनाचे ते सारथी झाले. मात्र त्यांनी अर्जूनाला केलेल्या उपदेशावर आज जग चालत आहे. (lord krishna quotes)

भगवंतांनी महाभारतात अनेक अनमोल विचार दिले आहेत, ज्यामुळे मानवजातीचं कल्याण होऊ शकतं. चला आज आपण भगवंतांचे विचार जाणून घेऊया… (lord krishna quotes)

(हेही वाचा – aloo matar paneer recipe: ढाबा स्टाइल आलू मटर पनीर बनवण्यासाठी फॉलो करा ही सोपी रेसिपी!)

१. कर्माचे फळ व्यक्तीला, अशा प्रकारे शोधून काढते,
जसं की वासरू कळपात असलेल्या,
गायींमधून आपल्या आईला शोधते.

२. वाईट कर्म करावे लागत नाहीत, तर ते आपोआप घडतात.
चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत, तर ती करावी लागतात.

३. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता,
तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो.
काही लोक याला दुःख म्हणतात,
तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात.

४. तुमचं मन जर ताब्यात ठेवलं नाही,
तर ते एखाद्या शत्रूप्रमाणे काम करायला लागेल.

५. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते
आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस
स्वतःचेच नुकसान करून घेतो. (lord krishna quotes)

६. मनुष्य आपल्या विचाराने तयार झालेला असतो,
जसा तो विचार करतो, तसा तो बनतो.

७. सतत संशय घेणारा माणूस या जगात काय, तर कुठेच आनंदी राहू शकत नाही.

८. जर तुम्ही तुमचं लक्ष्य मिळवण्यामध्ये पराभूत झाला,
तर तुम्ही तुमची रणनीती बदला, लक्ष्य नाही.

९. आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात,
आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात…

१०. कर्म करत रहा फळाची चिंता करू नका.

११. अशांत मनावर नियंत्रण मिळवणे कठीण असले,
तरीही विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय मिळवता येतो.

१२. अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात,
पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात.

१३. स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा,
ती नाती कधीच टिकत नाहीत.
पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा,
ती नाती कधीच तुटत नाहीत.

१४. ज्याच्या मनावर ताबा असतो तो उष्णता आणि थंडीत शांत असतो,
सुख-दुःखात आणि मान-अपमानात शांत असतो;
आणि परमात्म्याशी सदैव एकरुप असतो.

१५. तुमची भक्ती मला द्या आणि कर्माच्या बंधनातून मुक्त व्हा. (lord krishna quotes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.