-
ऋजुता लुकतुके
भारताच्या अनेक बॉलिवूडपटांमध्ये ही देखणी स्पोर्ट्सकार आपल्याला दिसली आहे. खासकरून मुख्य अभिनेता लंडनचा श्रीमंत उद्योगपती असेल तर ही स्पोर्ट्सकार त्याच्याकडे हवीच. अशा या कारचं सगळ्यात नवीन मॉडेल तुमच्या दाराशी हवं असेल तर मात्र तुम्हाला जवळ जवळ ३ कोटी रुपये मोजायची तयारी ठेवावी लागेल. कंपनीच्या काही निवडक भारतातील शोरुममध्ये ही कार उपलब्धही आहे. ही जगप्रसिद्ध ब्रिटिश ऑटोमोबाईल कंपनी आहे लोटस. त्यांची एमिरा हे नवी कोरी स्पोर्ट्स कार आता भारतातही लाँच झाली आहे. ही कार संपूर्णपणे ऑटोमेटेड आहे. या श्रेणीतील कंपनीची ही शेवटची कार असणार आहे. कारण, इथून पुढे कंपनीने फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक गाड्यांवरच लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे. (Lotus Emira)
(हेही वाचा- Pune Fire News : पुण्यात ग्रंथालयाला भीषण आग! अग्निशामक दल घटनास्थळी दाखल )
भारतात तीन श्रेणींमध्ये या कार लाँच होणार आहेत. म्हणजे इंजिनाचे प्रकार तीन असतील. पहिला प्रकार एएमजी कंपनीचं ३६० अश्वशक्तीचं २.० पेट्रोल इंजिन. तर दुसरं इंजिन २.० टर्बो पेट्रोल क्षमतेचं इंजिन. यात ८ स्पीडचा ड्युआल क्लच एएमटी असेल. तर तिसरा पर्याय म्हणजे टोयोटाचं ४०० अश्वशक्तीचं ३.५ पेट्रोल व्ही६ इंजिन. यात ६ स्पीड गिअर बॉक्स असेल. शून्य ते १०० किमीचा वेग गाठण्यासाठी या गाडीला ४.५ सेकंद लागतात. (Lotus Emira)
HOW DID I NEVER KNOW THIS? 😱
Win my Lotus Emira for free with @BOTB_Dreamcars, one of you will be taking home the Shmeemobile for absolutely nothing. Don’t miss you chance now at https://t.co/Hbbost9ODO
BOTB’s Free Competition is available to UK and IRL customers only. #Ad pic.twitter.com/Eg4sXYcfmv
— Shmee150 (@Shmee150) October 4, 2024
एमिरा कार स्पोर्ट्सकार आहे. त्यामुळे या वेगाचं महत्त्व जास्त आहे. मोकळ्या रस्त्यावर गाडी २९० किमी प्रती तास इतका सर्वोच्च वेग ही गाडी गाठू शकते. बाहेरून गाडीचा लुक हा एव्हिजा हायपरकार सारखा आहे. समोरून ही गाडी अगदी फेरारीसारखीच दिसते. कंपनीच्या शेवटच्या एमिरा गाडीला समोर एलइडी दिवे बसवण्यात आले आहेत. मागेही एलईडी दिव्यांची एक माळ आहे. (Lotus Emira)
(हेही वाचा- Ind vs NZ, 1st Test : जिगरबाज विराट कोहली आता सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत)
लोटसच्या जुन्या कारच्या तुलनेत ही नवी एमिरा अगदी आधुनिक आणि अद्ययावत आहे. गाडी दोन जणांसाठीच आहे. आधुनिकतेची साक्ष पटते ती समोरच्या १२.३ इंचांच्या डिस्प्लेनं. इन्फोटेनमेंट डिस्प्लेही १०.२५ इंचांचा आहे. तो ॲपल कार तसंच अँड्रॉईड ऑटोला जोडता येतो. किलेस गो ही आधुनिक सुविधा या गाडीतही आहे. तसंच गाडीचे वायपर गरज असेल तेव्हा आपोआप सुरू होतात. चालकाच्या सुरक्षेसाठी एडीएएस प्रणाली यात बसवण्यात आली आहे. दुसऱ्या गाडी किंवा अडथळ्याशी टक्कर होणार असेल तर गाडी आधीच आपलीआपण निर्णय घेऊन थांबते. (Lotus Emira)
(हेही वाचा- High Court च्या निकालामुळे दिलासा; जप्त केलेली EVM पुन्हा वापरण्यास परवानगी)
अशी ही श्रीमंत स्पोर्ट्सकार भारतात २.७ कोटी रुपयांपासून उपलब्ध असेल. तिची स्पर्धा असेल ती पोर्शच्या ७१८ केमन आणि जॅग्वार एफ टाईप कूपशी. (Lotus Emira)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community