दिबांग व्हॅली हा भारतातल्या अरुणाचल प्रदेश राज्यातला सर्वांत कमी लोकसंख्या असलेला एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचं क्षेत्रफळ ९,१२९ चौरस किलोमीटर एवढं आहे. जून १९८० साली लोहित जिल्ह्याच्या काही भागातून दिबांग व्हॅली हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. १६ डिसेंबर २००१ साली दिबांग व्हॅली हा दोन भागांमध्ये विभागाला गेला. दिबांग व्हॅली जिल्हा आणि लोअर दिबांग व्हॅली जिल्हा अशी त्या दोन भागांची नावं आहेत. (Lower Dibang Valley)
आकर्षणे
अनिनी : ईशान्य भारतातील सर्वात उत्तरेकडील जिल्ह्याची राजधानी.
प्रेक्षणीय स्थळे : मिपी, आलिने, अँग्रीम व्हॅली, आचेसो, डंब्युएन, मिहुंडो, एनगीपुलिन आणि विविध तलाव आणि धबधबे.
ऍक्टिव्हिटी : ट्रेकिंग, पिकनिक, अँलिंग, पॅराग्लायडिंग आणि रॉक क्लाइंबिंगसाठी आदर्श (Lower Dibang Valley)
(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election: “मविआच्या गाडीला ना ड्रायव्हर ना चाक”, धुळ्यातील सभेतून PM Modi यांचा हल्लाबोल)
संस्कृती आणि लोक
लोकसंख्या : प्रामुख्याने मिश्मी जमाती, विशेषत: इदू मिश्मी गटाची वस्ती.
भाषा : इदू मिश्मी बोली
सण : रेह (१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो) आणि के-मेह-हा (२४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो)
दिबांग व्हॅलीची भौगोलिक स्थिती
दिबांग नदी अरुणाचल प्रदेशच्या पर्वतांमधून उगम पावते. ही नदी तिथल्या दरी-खोऱ्यांतून वाहते. या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेल्या गावाला दिबांग व्हॅली असं म्हणतात. दिबांग नदीला अनेक उपनद्या आहेत. (Lower Dibang Valley)
(हेही वाचा – L. K. Advani : स्वयंसेवक ते राजकारणी – एक संघर्ष यात्रा)
दिबांग व्हॅली इथलं वनस्पती आणि प्राणिजीवन
दिबांग व्हॅली ही वनस्पती आणि वन्यजीवांनी समृद्ध आहे. मिश्मी टाकीन, लाल गोरल आणि गॉन्गशान मुंटजॅक यांसारखे दुर्मिळ सस्तन प्राणी इथे आढळतात. तर पक्ष्यांमध्ये दुर्मिळ स्क्लेटर मोनाल इथे पाहायला मिळतो. २००० सालच्या दशकात या जिल्ह्यामध्ये विज्ञानासाठी नवीन असलेली उडणारी खारुताई पाहण्यात आली. तिला मिश्मी जायंट फ्लाइंग स्क्विरल किंवा पेटॉरिस्टा मिश्मिएनसिस असं नाव देण्यात आलं आहे.
१९९१ साली दिबांग व्हॅली हे दिबांग इथल्या वन्यजीवाचं अभयारण्य झालं. या अभयारण्याचं क्षेत्रफळ ४,१४९ किलोमीटर वर्ग एवढं आहे. (Lower Dibang Valley)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community