सलग दुस-या दिवशी नाशकात राज्यातील नीच्चांकी तापमान! बोच-या थंडीला हलका ब्रेक

उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील बोच-या थंडीला मंगळवारी हलका ब्रेक लागला. सोमवारी थेट दहा अंशाखाली सरकलेला नाशिकचा पारा मंगळवारी १० अंश सेल्सिअसवर स्थिरावला. राज्यातील किमान तापमानाची नाशकात सलग दुस-या दिवशी नोंद झाली. मात्र त्यातुलनेत आता या भागांत किमान आणि कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. संक्रातीच्या दिवशी विदर्भ वगळता राज्यात बोचरी थंडी गायब राहील.

उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे तसेच विदर्भातील गारपीटीच्या प्रभावामुळे राज्यातील मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. तर उत्तर कोकणतील तापमानात सोमवारी लक्षणीय घट नोंदवली गेली. परिणामी कमाल तापमानही खाली घसरले. मंगळवारी मात्र उत्तर कोकणातील कमाल तापमानात एक ते दोन अंशाने, तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ पाहायला मिळाली. सध्या वीस जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका राज्यात फारसा दिसणार नाही. तापमान पुढील आठवडाभर सामान्य राहील, अशी माहिती वेधशाळा अधिका-यांनी दिली आहे.

( हेही वाचा : काय सांगताय! सर्दी झालीये नो टेन्शन! कोरोनापासून होऊ शकतो बचाव… )

राज्यातील मंगळवारचे कमाल आणि किमान तापमान

ठिकाण – किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)- कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

 • मुंबई (सांताक्रूझ)- १५.६ – २७.३
 • मुंबई (कुलाबा) – १७.५ – २७
 • डहाणू – १४.९ – २४.१
 • अलिबाग – १५.६ – २८
 • रत्नागिरी – १५.५ – २६.६
 • नाशिक – १० – २६.३
 • मालेगाव – १३.६ – तापमान नोंद झाली नाही
 • पुणे – ११.५ – २७.१
 • सातारा –१४ – २८.३
 • सांगली – १४.४ – २९.६
 • कोल्हापूर – १५- २८
 • औरंगाबाद – १४.४ – २५.६

( हेही वाचा : हुश्श! आता लवकरच ओमायक्रॉनवर मात करता येणार, कसं ते वाचा… )

 • बीड – १७.६ – तापमान नोंद झाली नाही
 • नांदेड – १९ – २७
 • अकोला – १७.३ – २३.९
 • अमरावती – १५.८ – तापमान नोंद झाली नाही
 • बुलडाणा- १४.४ – २२
 • ब्रह्मपुरी – १७.६ – २२
 • गोंदिया – १६.४— २०.५
 • नागपूर- १७.५- तापमान नोंद झाली नाही
 • वर्धा – १७.४- तापमान नोंद झाली नाही

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here