घरगुती सिलेंडरच्या दरांमुळे सर्वसामान्य ‘गॅस’वर… पुन्हा वाढल्या किंमती

अवघ्या 15 दिवसांत पुन्हा एकदा ही दरवाढ करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी विनाअनुदानीत गॅस सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरसाठी यापुढे सर्वसामांन्यांना 884.50 रुपये मोजावे लागणार आहेत. वाढत्या किंमतींमुळे सर्वसामांन्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे.

काय आहेत नव्या किंमती?

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीबरोबरच व्यावसायिक उपयोगासाठी वापरले जाणा-या गॅस सिलेंडरची किंमतही वाढवण्यात आली आहे. 19 किलो वजनाचे या सिलेंडरच्या दरात 75 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी घरगुती सिलेंडरसाठी ग्राहकांना 859.50 रुपये मोजावे लागत होते, त्याची किंमत आता 884.50 रुपये इतकी झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरसाठी 875.50 रुपये मोजावे लाग असताना आता त्याची किंमत 900.50 रुपये इतकी झाली आहे.

(हेही पहाः एक मच्छी आदमी को करोडपती बना देती हैं)

सातत्याने होत आहे वाढ

गॅस सिलेंडरच्या किंमती सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. 1 जुलै रोजी गॅस सिलेंडरच्या दरांत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच 17 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा या किंमतींमध्ये 25 रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे अवघ्या 15 दिवसांत पुन्हा एकदा ही दरवाढ करण्यात आली आहे. सध्या, सरकार दरवर्षी 14.2 किलोग्रॅमचे 12 अनुदानित एलपीजी सिलेंडर पुरवते. 12 रिफिलच्या वार्षिक कोट्यावर सरकारने पुरवलेल्या अनुदानाची रक्कम दरमहा बदलते.

सात वर्षांत दुप्पटीने वाढ

1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2021 दरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रत्येकी 190 रुपयांनी वाढ झाली आहे. या किंमती 7 वर्षांत दुप्पट झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशात एलपीजी गॅसच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमती आणि रुपया-डॉलरच्या विनिमय दरानुसार ठरवण्यात येतात. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असतानाच गॅस सिलेंडरचे दर सुद्धा वाढले आहेत.

(हेही वाचाः 1 सप्टेंबरपासून बेस्ट बसच्या मार्गांत बदल! कोणते मार्ग सुरू, कोणते बंद? वाचा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here