मॅजिक माउंटन हे लोणावळ्यात मुंढावरे येथे आहे.
मॅजिक माउंटनची वेळ
- एक दिवसीय पॅकेज सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०६.००
मॅजिक माउंटन लोणावळा इथल्या तिकिटांबद्दल माहिती
लोणावळ्यातलं मॅजिक माउंटन हे रोमांचक ऍक्टिव्हिटी करणाऱ्या सर्व लोकांसाठी एक अद्भुत ठिकाण आहे. लोणावळा इथल्या हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये हे अम्युझमेंट वसलेलं आहे. त्यामुळे तुमच्या विकएंडची मज्जा करायला निसर्गाच्या कुशीत असलेलं हे ठिकाण म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. या पार्कमध्ये सर्व वयोगटांतल्या लोकांसाठी सुलभ असलेल्या २९ पेक्षा जास्त रोमांचकारी थ्रिलिंग राइड्स आहेत. त्यामुळे कुटुंबातल्या सर्व वयोगटातल्या लोकांना एक चांगला अनुभव घेता येईल.
मॅजिक माउंटन ॲम्युझमेंट पार्कमध्ये लहान मुलं, फॅमिली आणि मित्रांसाठी अशा एकूण २९ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राईड्स आहेत. त्यांमध्ये झेड-फोर्स, टर्बो फोर्स, जायंट फ्रिस्बी, स्काय स्क्रीमर, टॉप स्पिन आणि इतर जागतिक दर्जाच्या राईड्सचा समावेश आहे. (magic mountain lonavala)
मॅजिक माउंटन इथल्या वॉटर पार्कमध्येही अनेक थ्रिलिंग राईड्स आहेत.
(हेही वाचा – Meenatai Thackeray Flower Market : व्यापाऱ्यांवरील कारवाईमुळे दोन्ही शिवसेनेत शाब्दिक चकमक)
हाय थ्रिल राइड्स :
टॉप स्पिन सस्पेंड, जायंट फ्रिस्बी, टर्बो फोर्स आणि फ्लिपिंग आर्म ॲक्शन (वयोगट: १८ ते ५० वर्षं)
मिड थ्रिल राइड्स :
डेल्टा हॉपला, स्पेस ट्रेनर, झेड फोर्स, स्काय स्क्रिमर, सुपर स्प्लॅश, मेगा डिस्को, एअर रेस, फ्लाइंग कॅरोसल आणि ५D थिएटर (वयोगट: १५ ते ५० वर्षं)
फॅमिली थ्रिल राइड्स :
कार्निव्हल, मेगा जंप-इन-स्टार, रश अवर, वॉटर मॅनिया, मॅजिक बाइक्स, डिमॉलिशन डर्बी, गॅलियन, वेव्ह ब्लास्टर, सांबा बलून, क्रेझी सर्फ, स्काय रेस, काइट फ्लायर, म्युझिकल फाउंटन, सर्फ अप इत्यादी. (magic mountain lonavala)
किड्स राइड्स :
ट्रक एन ट्रेल, ज्युनियर जेट, फेरीस व्हील (१० वर्षांखालील मुलांसाठी)
या पॅकेजमध्ये जेवणाचा समावेश केलेला नाही. पण ठिकाणी असलेल्या रेस्टॉरंटमधून जेवण मिळू शकतं.
मॅजिक माउंटन, लोणावळा इथलं तिकीट बुक करून तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असलेल्या दिवसाचा आनंद घेऊ शकता.
मॅजिक माउंटन, लोणावळा येथे कसं पोहोचायचं?
हे ठिकाण मुंबईपासून सुमारे ९५ किलोमीटर आणि लोणावळा शहरापासून ११ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. सार्वजनिक किंवा खाजगी वाहतुकीने या ठिकाणी सहज पोहोचता येतं. (magic mountain lonavala)
- जवळचं रेल्वे स्थानक :
नाशिक रेल्वे स्थानक हे इथून सर्वांत जवळचं रेल्वे स्थानक आहे. नाशिकला जाण्यासाठी प्रमुख शहरांतून अनेक गाड्या उपलब्ध आहेत.
- जवळचं विमानतळ :
नाशिक विमानतळ हे सर्वांत जवळचं विमानतळ आहे. इथे पोहोचण्यासाठी प्रमुख शहरांमधून अनेक फ्लाईट्स उपलब्ध आहेत.
(हेही वाचा – लॉंड्री सेंटरपैकी एक असलेल्या Mumbai Dhobi Ghat का प्रसिद्ध आहे? जाणून घेऊयात )
मॅजिक माउंटन, लोणावळाबद्दल अधिक तपशील
मॅजिक माउंटन, लोणावळा इथे जाण्यापूर्वी खालील गोष्टी जाणून घ्या.
- इथे प्रत्येकासाठी वॉशरूमची वेगळी सोय आहे.
- या पार्कमध्ये कॉमन मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट उपलब्ध आहेत.
- कृपया प्रत्येक राईडच्या वापरासाठी नियमांचे पालन करा.
- उद्यानाच्या आवारात बाहेरील खाद्यपदार्थ/पेय पदार्थांना परवानगी नाही.
- अल्कोहोल किंवा इतर अंमली, विषारी पदार्थांच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीला पार्कच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई आहे. तसे कोणीही आढळल्यास त्याला पार्कमधून बाहेर काढलं जाईल आणि कोणताही परतावा दिला जाणार नाही.
- पार्कच्या आवारात व्यक्तीसोबत/बॅगेजमध्ये अल्कोहोलयुक्त पेय/ड्रग्ज नेण्यास सक्त मनाई आहे. तो दंडनीय अपराध आहे.
- कृपया तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. कोणत्याही मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाल्यास पार्कची व्यवस्थापन समिती जबाबदार नाही.
- ज्या व्यक्तींवर वैद्यकीय किंवा आरोग्य निर्बंध असतील अशा व्यक्तींनी कोणत्याही राईड्स/ स्लाइड्स वापरू नयेत.
- राईड्स/स्लाईड्सवर जाताना सनग्लासेस आणि प्रिस्क्रिप्शन लेन्स घालण्याची परवानगी नाही.
- तुम्हाला फोटो काढण्यापासून किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापासून थांबवण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.
- पार्कच्या आवारामध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
- प्रत्येक राईडचं स्पेसिफिकेशन वेगळं असतं. त्यामुळे कोणत्याही राईडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा सूचना व्यवस्थित तपासून घ्या.
- ३.३ फूटपेक्षा कमी उंचीच्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत मोफत प्रवेश मिळू शकतो. ३.३ फूट ते ४.६ उंचीच्या मुलांना लहान मुलांच्या तिकिट दरांनुसार शुल्क आकारलं जातं. त्यापेक्षा जास्त उंचीच्या व्यक्ती किंवा मुलांना प्रौढांच्या तिकिट दरानुसार शुल्क आकारलं जातं.
- इथे येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांनी त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसाचे तपशील जमा करणं गरजेचं आहे. तसंच इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आयडी असणं अनिवार्य आहे. (magic mountain lonavala)
(हेही वाचा – कूपर रुग्णालयात आता Cleanup Marshal ची नजर!)
मॅजिक माउंटन, लोणावळा इथे फिरण्यासाठी आवश्यक वस्तू
- कॅप्स
- वॉकिंग शूज
हेही पहा –
Join Our WhatsApp Community