महाशिवरात्रीला आरोग्यदायी उपवास करा; जाणून घ्या या टिप्स

160

महाशिवरात्री हा हिंदुसाठी मोठा सण आहे. संपूर्ण भारतभर मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास धरतात. उपवासाच्या पदार्थांमध्ये कॅलरीज वाढविणारे घटक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपवास काहीवेळा रोग्यदायी ठरत नाही. उपवासाचा खरा अर्थ पोटाला आराम देणे हा असून तसे न होता उपवासाच्या दिवशी नेहमीप्रमाणेच किंबहुना त्याहून जास्त खाण्याकडे कल असल्याचे दिसते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना तसेच सामान्यांनाही आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. पण उपवास करायचा असल्यास तो आरोग्यदायी होईल असा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यासाठी काय आहेत या टिप्स जाणून घेऊया…

१. उपवासाच्या दिवशी आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करायला हवा. आपल्याकडे साधारणपणे साबुदाण्याची खिचडी खाण्याची पद्धत आहे. त्यात जास्त प्रमाणात कार्बोदके असतात त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. साबुदाणा मर्यादेत खाल्ल्यास त्रास होत नाही.

२. खजूर, राजगिरा, सुकामेवा, रताळे हे उपवासाच्या दृष्टीने चांगले पदार्थ आहेत. त्यामुळे शरीरात त्राण टिकून राहतो आणि शारीरिक त्रास होण्याची शक्यता कमी असते.

३. फळ आहार हा कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी योग्य आहे. उपवासाच्या दिवशी फळांचा आहारात समावेश केल्याने पित्ताचा त्रास होत नाही. तसेच पुरेशी भूक भागते आणि शरीरातील उर्जा टिकून राहाते.

४. लिंबू सरबत, ताक, दूध, शहाळं पाणी यांसारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तसेच दिवसभर ताजेतवाने वाटते.

५. उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ शक्यतो टाळावे. कारण महाशिवरात्री दरम्यान वातावरणातील तापमान जास्त असते. अशावेळी पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे साबुदाणा वड्याऐवजी साबुदाण्याची खीर खावी.

उपवास करण्याचे फायदे

  • उपवास केल्याने शरीराची भोजन पध्दत सुधारते. त्यामुळे चांगली भूक लागते.
  • उपवास केल्यामुळे पचनशक्तीला थोडा आराम मिळतो. त्यामुळे मेटाबॉलिझमला कलरीज बर्न करण्याची संधी मिळते.
  • उपवास केल्याने BDNF नावाचे प्रोटीनची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते. या प्रोटीनने मेंदुची गती वाढते.
  • शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे स्किन चांगली राहते आणि केस मजबुत होतात.
  • इम्युनिटी सिस्टीममध्ये सुधारणा होते.
  • वृध्दत्वाची चिन्हे दिसत नाही.

(हेही वाचा- Health Tips: घसा खवखवतोय? तर घरातील ‘हे’ पदार्थ ठरतील रामबाण उपाय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.