Mahalakshmi Temple Mumbai : मुंबईतील महालक्ष्मी मंदिराचा रंजक इतिहास! देवीने स्वतःच प्रकट होऊन दिला आशीर्वाद

143
Mahalakshmi Temple Mumbai : मुंबईतील महालक्ष्मी मंदिराचा रंजक इतिहास! देवीने स्वतःच प्रकट होऊन दिला आशीर्वाद

महालक्ष्मी मंदिर (Mahalakshmi Temple) हे मुंबईतील सर्वात प्राचीन धार्मिक स्थळांपैकी एक आहे. समुद्रकिनारी बी. देसाई मार्गावर वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर, आकर्षक आणि लाखो लोकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. मंदिरात तीन अतिशय सुंदर मूर्ती आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती एकत्र आहेत. तिन्ही मूर्ती सोन्या-मोत्यांच्या दागिन्यांनी सजवण्यात आल्या आहेत. (Mahalakshmi Temple Mumbai)

नवरात्रीच्या उत्सवादरम्यान, असंख्य हिंदू भाविक देवीला नारळ, फुले आणि मिठाई अर्पण करतात. कोकणवर राज्य करणार्‍या शिलाहार राजवंशाची कुमदेवी महालक्ष्मी होती असे उल्लेख आढळतात. माता लक्ष्मीला धन-संपत्तीची देवी मानले जाते. घरात आणि व्यवसायात सुख-समृद्धी नांदण्यासाठी महालक्ष्मीची पूजा केली जाते. (Mahalakshmi Temple Mumbai)

महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिर परिसरात विविध देवी-देवतांच्या आकर्षक मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. तसेच मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे. वरळी आणि मलबार हिल यांना जोडण्यासाठी मुंबईत फार पूर्वी भिंत बांधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. या भिंतीच्या कामात शेकडो मजूर काम करत होते, मात्र दररोज कुठला ना कुठला अडथळा येत होता. त्यामुळे अभियंता खूप अस्वस्थ झाला. खूप कष्ट करूनही भिंत उभारता येत नव्हती. अनेक वेळा संपूर्ण भिंत कोसळली. (Mahalakshmi Temple Mumbai)

(हेही वाचा – Hyundai Tucson 2024 : युरोप गाजवल्यावर आता ह्युंदे टक्सन भारतात येण्याच्या तयारीत)

या प्रकल्पाचे मुख्य अभियंता रामजी शिवाजी यांनी एक स्वप्न पडले. माता लक्ष्मी स्वप्नात दिसली आणि म्हणाली की वरळीच्या समुद्रकिनारी माझी एक मूर्ती आहे. तिथून ती मूर्ती बाहेर काढ आणि समुद्रकिनारीच माझी प्रतिष्ठापना कर. असे केल्याने सर्व अडथळे दूर होऊन वरळी-मलबार हिल दरम्यानची भिंत सहज उभारली जाईल. मग त्या अभियंत्यांनी मूर्ती शोधण्याचे आदेश दिले. काही वेळाने महालक्ष्मीची भव्य मूर्ती मिळाली. मग तिथे लहानसे मंदिर बांधण्यात आले. अशाप्रकारे देवी स्वतः प्रकट झाली होती. आज इथे भव्य मंदिर उभे आहे. (Mahalakshmi Temple Mumbai)

आजही लाखो भाविक येऊन देवीचा आशीर्वाद घेतात. देवीसमोर नतमस्तक होता आणि देवी भक्तांची मनोकामना पूर्ण करते. महालक्ष्मी स्टेशनपासून टॅक्सी किंवा बसद्वारे तुम्ही मंदिराला भेट देऊ शकता. तसेच ग्रॅंट रोड स्टेशनवरुनही या मंदिरात जाता येते. गुरुवार, शुक्रवार इथे मोठी रांग लागलेली असते. तसेच नवरात्रीत देवीचा उत्सव असतो. (Mahalakshmi Temple Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.