महाराजा एक्स्प्रेस (Maharajas Express) ही एक लक्झरी टुरिस्ट ट्रेन आहे. ही ट्रेन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC द्वारे चालवली जाते. महाराजा एक्स्प्रेस ही ट्रेन वर्षभरातल्या ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यांच्या काळात भारताच्या वायव्य भागात आणि मध्य भारतात (प्रामुख्याने राजस्थानमध्ये) चार ठराविक रेल्वे मार्गांवर सेवा देते.
महाराजा एक्स्प्रेस (Maharajas Express) या ट्रेनला ओरिएंट एक्स्प्रेस ऑफ ओरिएंट असंही म्हटलं जातं. महाराजा एक्स्प्रेस या ट्रेनला २०१२ ते २०१८ सालादरम्यान वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्समध्ये सलग सात वेळा “जगातली सर्वांत आघाडीची लक्झरी ट्रेन” म्हणून निवडण्यात आलं होतं. २०२२ साली महाराजा एक्स्प्रेसला कोंडे नास्ट ट्रॅव्हलर रीडर्स चॉईस ट्रॅव्हल अवॉर्डनेही सन्मानित केलं गेलं आहे.
(हेही वाचा – Saptashrungi Temple : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी मंदिर; जाणून घ्या मंदिराचा दिव्य इतिहास!)
कॅरिएज
या ट्रेनमध्ये २३ कॅरिएज आहेत. त्यांत राहणे, जेवण, बार, लाउंज, जनरेटर आणि स्टोअर कॅरिएज यांचा समावेश आहे. एकूण ८४ प्रवाशांची क्षमता असलेल्या १४ गेस्ट कंपार्टमेंट मध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे. महाराजा एक्स्प्रेस (Maharajas Express) ट्रेनमध्ये राजा क्लब नावाचा एक लाउंज देखील आहे. या लाउंजमध्ये एक खाजगी बार, दोन डायनिंग कॅरिएज आणि एक बार कॅरिएज आहे. या ट्रेनमध्ये वॉटर फिल्ट्रेशन प्लांटसुद्धा आहे.
गेस्ट केबिन
गेस्ट कॅरिएजमध्ये ८४ पाहुण्यांसाठी बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी व्यवस्था आहे. त्यांपैकी २० डिलक्स केबिन, १८ ज्युनियर सुइट्स, ४ सुइट्स आणि एक प्रेसिडेंशियल सुइट आहे. महाराजा एक्स्प्रेसच्या सर्व सुइट्समध्ये परिपूर्ण बाथरूम्स आहेत. प्रेसिडेंशियल सूटमध्ये संपूर्ण रेल्वे कॅरिएज आहे. ज्यामध्ये एक स्वतंत्र सिटिंग-कम-डायनिंग रूम, मास्टर बेडरूम आणि शॉवर आणि बाथटबसह बाथरूम आहे. तसंच ट्विन बेडरूम आणि शॉवरसह बाथरूमही समाविष्ट आहे.
(हेही वाचा – Pandharpur : नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार ; मंदिर समितीचे अनेक ऐतिहासिक निर्णय)
डायनिंग आणि बार कोच
महाराजा एक्स्प्रेस (Maharajas Express) या ट्रेनमध्ये रंग महाल आणि मयूर महाल नावाचे दोन डायनिंग कॅरिएज आहेत. हे कॅरिएज परिपूर्ण आणि सर्वोत्तम जेवणाची सेवा प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहेत. मयूर महाल म्हणजेच मयूर रेस्टॉरंटमध्ये मोरपीसाच्या थीमने सजावट केलेली आहे. राजा क्लब हा एक बार कॅरिएज आहे. तसंच सफारी लाउंज आणि बारमध्ये बहुभाषिक लायब्ररी देखील आहे.
महाराजा एक्स्प्रेसच्या तिकिटाची किंमत किती आहे?
महाराजा एक्स्प्रेसच्या (Maharajas Express) तिकिटांची किंमत ही, तुम्ही कोणलं प्रवास पॅकेज आणि राहण्याची व्यवस्था निवडता यावर अवलंबून असतो. वेगवेगळ्या पॅकेजेसनुसार महाराजा एक्सप्रेसच्या तिकिटाची किंमत बदलू शकते.
पण तरीही महाराजा एक्स्प्रेसच्या सर्वात कमी किंमतीच्या तिकिटांची सुरुवात ₹३,९०,६००/- प्रति व्यक्तीपासून होते. या पॅकेजमध्ये ३ रात्री आणि ४ दिवसांसाठी ट्विन शेअरिंग स्वरूपात डिलक्स केबिन दिला जातो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community