सरकारने जाहीर केली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी! 2023 मध्ये मिळणार २४ सुट्ट्या पहा संपूर्ण यादी

695

नववर्षात प्रत्येकालाच वर्षाला किती सार्वजनिक सुट्ट्या मिळतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सन २०२३ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर सुट्ट्यांची यादी ही राज्यातील सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहेत. सन २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांना एकूण २४ दिवस सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत.

( हेही वाचा : झोप किंवा ओव्हरस्पीडिंग नाही! ऋषभने स्वत: सांगितले अपघाताचे खरे कारण; DDCA च्या संचालकांनी दिली माहिती)

सुट्ट्यांची संपूर्ण यादी…

  1. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार
  2. महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार
  3. छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार
  4. होळी (दुसरा दिवस) ७ मार्च मंगळवार
  5. गुढीपाडवा २२ मार्च बुधवार
  6. रामनवमी ३० मार्च गुरुवार
  7. महावीर जयंती ४ एप्रिल मंगळवार
  8. गुड फ्रायडे ७ एप्रिल शुक्रवार
  9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल शुक्रवार
  10. रमझान ईद – २२ एप्रिल शनिवार
  11. महाराष्ट्र दिन १ मे सोमवार
  12. बुद्ध पौर्णिमा ५ मे शुक्रवार
  13. बकरी ईद (ईद उल झुआ) २८ जून बुधवार
  14. मोहरम २९ जुलै शनिवार
  15. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मंगळवार
  16. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट बुधवार
  17. गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार
  18. ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवार
  19. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर सोमवार
  20. दसरा २४ ऑक्टोबर मंगळवार
  21. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर रविवार
  22. दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर मंगळवार
  23. गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर सोमवार
  24. ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.