कोरोनाचं (Corona) सावट अतिशय धीम्या गतीनं जगावरून दूर झालं. आता एका नव्या विषाणूच्या संसर्गानं साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये (China) या विषाणूचा संसर्ग गंभीर रुप धारण करत असतानाच कोरोनासम या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी भारतातही आरोग्य यंत्रणा सज्ज होताना दिसत आहेत. HMPV म्हणजेच मानवी मेटान्यूमोव्हायरस चीनमध्ये वेगाने पसरत आहे. अनेक लोकांना याची लागण झाली असून चीनमधील रुग्णालयांमध्ये HMPV च्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा-मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही, सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा: Bombay High Court
स्मशानभूमीतही मृतदेह दफन करण्यासाठी लांबच लांब रांगा दिसत आहेत, पण चीन हे मानायला तयार नाही. सोशल मीडियावर फिरत असलेले वृत्त चीनने फेटाळले आहे. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील चीन सुरक्षित असल्याचे बिजींगकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यातून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या आरोग्य मंडळाने (Maharashtra Health Department) जिल्हा रुग्णालयांना पत्र लिहलं असून यामध्ये HMPV माहिती दिली असून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- भारताला विश्वविजेता होण्याचा विश्वास देणारा अद्भुत कर्णधार Kapil Dev
चीनमधील कोविडसदृश्य HMPV वायरस मुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. घाबरू नका, पण सावध राहा असा सल्ला राज्यातील आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांना देण्यात येत आहे. सोबतच सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, राज्यात सर्वांनीच स्वच्छतेच्या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही सतर्कता बाळगत आरोग्य विभागानं सदर प्रकरणी सावधगिरीची पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे. (HMPV )
आरोग्य विभागाच्या पत्रात काय म्हटलंय?
सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (HMPV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांनी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी एक निवेदन प्रसिध्द केले आहे. (HMPV)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community