दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य सरकारचा अनोखा उपक्रम!

120

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी महाशरद पोर्टल सुरु करण्यात आले आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींनी सदर पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ‘दिव्यांग व्यक्ती हक्क’ अधिनियमातील विशेषत्वाने नमूद केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर नोंदणी करुन आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात. सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्यांना विनामूल्य जोडणारा दुवा आहे. महाराष्ट्रातील दिव्यांगांना व्यासपीठ तयार करुन देणे, ज्यामध्ये विविध भागातील दिव्यांग आपले नाव सहज नोंदवू शकतात.

( हेही वाचा : आता आयफेल टॉवरपेक्षाही उंचावरुन धावणार भारतीय रेल्वे )

पोर्टलची निर्मिती

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्यांनी एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देणे, विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परिस्थिती आणि गरजा समजून घेणे, दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

( हेही वाचा : ‘हा’ परदेशी पाहुणा तीन वर्षांनी राजापूरात दाखल! )

यासाठी वेबसाईट पुढील प्रमाणे :- https://www.mahasharad.in 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.