महाराष्ट्र पर्यटनाचा अनोखा उपक्रम; महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटकांना ४ दिवस या ठिकाणांची मोफत सफर

148

26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दिनांक 26 नोव्हेंबर, 2022 रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उदघाटन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, पर्यटन सचिव सौरभ विजय आणि पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता चेंबूर येथे फाईन आर्टस सोसायटी येथे संपन्न होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातून चैत्यभूमी दादर येथे मोठया संख्येने अनुयायी आणि पर्यटक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवा‍‌दन करण्यासाठी दरवर्षी भेट देत असतात. तरी त्यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे तसेच बौध्द लेणी यांचे दर्शन घडविण्यासाठी हे टूर सर्कीट बनवण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट 

( हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांचा प्रवास होणार सुकर; लवकरच बीआरटी मार्ग विकसित करणार )

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौध्द लेणीवर आधारीत हे टूर सर्कीट तयार करण्यात आले असून दिनांक 3 व 4 डिसेंबर आणि 7 व 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजित टूरमध्ये चैत्यभुमी, राजगृह, डॉ. बाबसाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबसाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समाविष्ट आहे. सदर उपक्रम हा ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने पर्यटकासाठी उपलब्ध करण्यात येत आहे.”

पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, “पर्यटन संचालनालयाद्वारे व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने दिनांक 6 डिसेंबर, 2022 रोजी दादर चैत्यभूमी येथे स्टॉल उभारुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटची प्रसिध्दी व प्रचालन करण्याचे प्रस्तावित आहे. सदर टूर सर्कीट हे पर्यटन संचालनालय मुंबई टूर गाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क व महाराष्ट्रामधील मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सहा जिल्हयात पर्यटकांसाठी राबविण्यात येणार आहे.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.