maharashtra traditional dress : महाराष्ट्रातली पारंपारिक वेशभूषा! तुम्हालाही आवडतात का असे कपडे?

1264
maharashtra traditional dress : महाराष्ट्रातली पारंपारिक वेशभूषा! तुम्हालाही आवडतात का असे कपडे?

महाराष्ट्र हे भारतातलं क्षेत्रफळाच्यादृष्टीने तिसरं तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरं मोठे राज्य आहे. आपल्या महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर माऊली, नामदेव, चोखामेळा, एकनाथ आणि तुकाराम महाराजांसारख्या वारकरी संतांचा मोठा इतिहास आहे. हा इतिहास महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा मूलभूत पाया आहे. त्या काळी मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या महाराष्ट्राशेजारच्या प्रदेशांवर महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा मोठा प्रभाव होता. (maharashtra traditional dress)

महाराष्ट्र राज्य हे पाच प्रदेशांमध्ये विभागलेलं आहे. ते म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ होय. मराठी भाषेच्या विविध पोटभाषा, लोकगीतं, खाद्यपदार्थ, वेशभूषा आणि जातीयतेच्या रूपात प्रत्येकाची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे. त्यांपैकी आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या पारंपरिक वेशभूषेविषयी थोडी माहिती देणार आहोत. चला तर मग पाहुयात.. (maharashtra traditional dress)

पूर्वीच्या काळी इथल्या स्त्रिया नऊवारी साडी आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरायच्या. ही साडी खूप लांब असते. ही एक खास प्रकारे काष्ठा मारून नेसली जाते. नऊवारी साडी खास आहे कारण ती अशा प्रकारे नेसली केली जाते की परकर वापरण्याची गरज नसते. (maharashtra traditional dress)

(हेही वाचा – “असे गुन्हे झाले की त्याला फाशीच…”, उरण हत्या प्रकरणानंतर Sharmila Thackeray यांचा संताप)

या वेशभूषेला महाराष्ट्रात आहे खूप महत्त्व 

तसंच पैठणी साडीला महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. पैठणी साडी हातमागावर विणलेल्या डिझाइनसाठी आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे. पैठणी साडीच्या पदरावर जरतारीचं नक्षीकाम हातांनी विणून करण्यात येतं. ह्या साड्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतलं वेगळेपण आणि वैभव दर्शवतात. त्यासोबत पायांत सुंदर चामड्याच्या चपला वापरल्या जायच्या. (maharashtra traditional dress)

तसंच पूर्वी पुरुष सहसा धोतर, सदरा आणि फेटा वापरत असत. धोतर हे कमरेपासून खाली वापरलं जातं. हे सुद्धा एक लांब कापड असतं. धोतरसुद्धा काष्ठा मारून नेसतात. शरीराच्या वरच्या भागासाठी पुरुष सदरा घालायचे आणि डोक्यावर फेटा बांधायचे. फेटा या वेशभूषेला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. (maharashtra traditional dress)

(हेही वाचा – Kodaikanal Tourist Places : कोडइकनालमधील या १० पर्यटनस्थळांना अवश्य भेट द्या)

वेशभूषा जपणं महत्त्वाचं

बऱ्याचदा औपचारिक दिसण्यासाठी पुरुष बंडी म्हणजे एक प्रकारचं स्लीव्हलेस जॅकेट वापरायचे. तसंच पायांमध्ये टिकाऊ लेदरपासून तयार केलेल्या चपला वापरायचे. महाराष्ट्रातील पुरुषांची सांस्कृतिक ओळख दर्शवण्यासाठी हा पोशाख विशेष प्रसंगी आणि सणांमध्ये परिधान करतात. (maharashtra traditional dress)

वेशभूषेमुळे आपल्या राज्याचा इतिहास कळतो. राज्यातले लोक कसे जगायचे आणि कसे काम करायचे ते जाणून घेता येतं. आपल्या महाराष्ट्र राज्याची पारंपरिक वेशभूषा आपल्या आयुष्याचाच एक भाग म्हणून जपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली वेशभूषा ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. (maharashtra traditional dress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.