रक्तदानाला श्रेष्ठदान म्हटले गेले आहे. रक्तदान केल्याने शेकडो मानवांचे प्राण वाचतात. म्हणूनच सुदृढ नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले जाते. पण, आता प्राण्यांनाही रक्तदानाने जीवदान मिळू शकते, ही बाब उपचारातून पुढे आली आहे. वर्ध्यात नात्याने वडील असलेल्या रुद्र श्वानाच्या रक्ताने राॅटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ श्वानाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले आहे.
(हेही वाचा महाराष्ट्र बंद : उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला विचारला जाब! म्हणाले…)
रक्तदान करुन दिले जीवदान
वर्ध्यातील लेनीन कांबळे यांच्या सात महिन्यांच्या रॉटव्हीलर ओरिओ नामक श्वानाची प्रकृती अचानक ढासळली. त्याला उपचारासाठी पशू चिकीत्सक डॉ. संदीप जोगे यांच्याकडे नेण्यात आले. विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचिडपासून पसरणाऱ्या इहर लिचिया नावाच्या आजाराची लागण झाल्याचे समजले. ओरिओच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. हिमोग्लोबिन पातळीही कमी झाली होती. त्याला रक्त चढवण्याची आवश्यकता होती. याची माहिती रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्र नामक श्वानाच्या मालकाला देण्यात आली. त्यांनी रुद्रचे रक्तदान करण्यास संमती दिली. मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ओरिओचे वडील असलेल्या रुद्रचे रक्त देऊन जीवदान देण्यात आलं. मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला चाचणीनंतर ब्लड ट्रान्सफ्यूजन पद्धतीचा वापर करून, रुद्र नामक श्वानाचं रक्त देण्यात आलं. सध्या ओरिओची प्रकृती उत्तम आहे. यापूर्वी माऊली नामक श्वानाला रुद्र नामक श्वानानेच रक्तदान करून जीवदान दिलं होतं.
प्राण्यांच्या ब्लड बॅंकेची गरज
माणसांकरता ब्लड बँक उपलब्ध असतात. त्यांना त्यातून रक्त मिळते. प्राण्यांनाही रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवता येतात. पण, प्राण्यांबाबत ब्लड बँक पाहायला मिळत नाही. त्यामुळे गंभीर परिस्थितीत प्राण्यांना जीवनदान मिळण्याकरीता ब्लड बँकेची असायला हवी.
( हेही वाचा: Zomato आणि Swiggy वरून ऑनलाईन फूड ऑर्डर करताय? मग ही बातमी वाचा…)
Join Our WhatsApp Community