देशभरात डिसेंबरमध्ये हुडहुडी, पण राज्य होणार ओलचिंब

119

सध्या देशभरासह राज्यात थंडीच्या गारठ्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. महाराष्ट्रातील काही मोजक्या शहरात कडाक्याची थंडी पडली असताना हवामान खात्याने राज्यात पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज वर्तविला आहे. राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंधीया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांत; तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासह 27 डिसेंबर रोजी विर्दभात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

नववर्षाच्या पूर्वीच राज्यात पुन्हा पावसाच्या सरी

दरम्यान, नव वर्ष सुरू होण्याआधीच राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या मुसळधार सरी बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात विदर्भ, मराठवाडा येथे कडाक्याची थंडी असून गडचिरोलीत कमाल तापमानात घट झाली आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने डिसेंबरच्या अखेरीस पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.  डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यावेळी हिवाळ्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच आता नव वर्ष सुरू होण्यापूर्वीच राज्यात पुन्हा पावसाच्या सरी राज्यात बरसणार आहेत.

५ जानेवारीपर्यंत काही भागात थंडीची लाट

हवामान खात्याने असेही म्हटले की, ५ जानेवारी २०२२ पर्यंत भारतातील काही ठराविक भागात थंडीची लाट राहणार नाही. मात्र २४ नोव्हेंबर रोजी देशाच्या विविध भागात थंडीची लाट येऊ शकते. यासह २७ ते ३० डिसेंबरदरम्यान, सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे बिहारच्या बऱ्याच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.