-
ऋजुता लुकतुके
महिंद्राच्या बीई ६ आणि एक्सईव्ही ९ई या दोन्ही गाड्या भारतात एकाच वेळी लाँच होत आहेत. आणि त्यांची टेस्ट ड्राईव्हही काही शहरांमध्ये सुरू झाली आहे. तीन टप्प्यांमध्ये हे टेस्ट ड्राईव्ह चालणार आहे. दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, पुणे आणि बंगळुरू इथं टेस्ट ड्राईव्ह सुरूही झाल्या आहेत. तर दुसरा टप्पा २३ जानेवारी आणि तिसरा टप्पा ७ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. या दोन टप्प्यांमध्ये इतरही शहरातील लोकांना ही गाडी चालवून बघता येईल. (Mahindra BE 6)
(हेही वाचा- धनंजय मुंडेंच्या काळात दीड हजार रुपयांचे पंप खरेदी केले साडेतीन हजाराला; Bombay High Court ने उपस्थित केले प्रश्न)
पॅक वन, पॅक टू आणि पॅक थ्री अशा तीन प्रकारांमध्ये या दोन्ही गाड्या मिळणार आहेत. ग्राहकांना आपला पर्याय निवडायचा आहे. त्यानुसार, गाडीतील फिचर आणि बॅटरी क्षमता बदलेल. बीई ६ मध्ये चालक आणि त्याच्या शेजारी बसणाऱ्या प्रवाशासमोर दोन मोठे डिस्प्ले असतील. गाडीत वायरलेस चार्जिंगची सोय आहे. हर्मन कार्बन कंपनीची १६ स्पीकर असलेली प्रणाली यात बसवण्यात आली आहे. तर गाडीचं छत चक्क स्वयंप्रकाशित दिव्यांचं असेल. गाडीत एआर म्हणजे ऑगमेंटेड रियालिटीवर आधारित डिस्प्लेही असेल. त्यात चालकाला गाडीचा वेग, दिशा पुढील मार्ग आणि काही महत्त्वाच्या गोष्टी दिसू शकतील. (Mahindra BE 6)
Highest Bncap score for Mahindra BE 6 and XeV 9e! pic.twitter.com/TpLujXc6a2
— Somnath Chatterjee (@SomChaterji) January 16, 2025
बी ६ गाडीत ५९ केडब्ल्यूएच आणि ७९ केडब्ल्यूएच असे बॅटरी पॅकचे दोन पर्याय असतील. इंजिनाची शक्ती २३१ पीएस ते २८६ पीएस इतकी असेल. आणि एका चार्जमध्ये गाडी ५३५ किमी चालू शकेल असा कंपनीचा दावा आहे. बॅटरीबरोबर येणारा चार्जर २० ते ३० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यत गाडी चार्ज करू शकतो. (Mahindra BE 6)
(हेही वाचा- Republic Day 2025 : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्ये ध्रुव-तेजस नसणार; कारण काय ?)
महिंद्रा बीई ६ गाडीची किंमत १८ ते २६ लाखांच्या दरम्यान आहे. पण, या गाडीला भारतीय बाजारात तगडी स्पर्धा असेल. टाटा कर्व्ह, इ व्हिटारा, हुंडे क्रेटा आणि एमजी झेडएस या गाड्यांशी तिची स्पर्धा असेल. दरम्यान, नुकतेच या गाडीने एनसीएपी टक्कर चाचणीत ५ पैकी ४ गुण मिळवले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हा मानांकन अत्यंत मोलाचं आहे. (Mahindra BE 6)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community