-
ऋजुता लुकतुके
महिंद्रा ही भारतीय कार उत्पादक कंपनी फिचर्सच्या बाबतीत आता जागतिक कंपन्यांशी स्पर्धा करू लागली आहे. आणि इलेक्ट्रिक अवतारातील गाड्या आणत असताना या गाड्यांचा लुकही आधुनिक असेल याची काळजी कंपनीने आपल्या नवीन दोन कारमध्ये पुरेपूर घेतली आहे. महिंद्रा एक्सईव्ही ९ई ही गाडी आहे ३५ लाख रुपयांच्या आतली. पण, त्यातील काही फिचर हे अगदी लक्झरी कारलाही लाजवणारे आहेत. (Mahindra XEV 9E)
(हेही वाचा- Republic Day 2025 : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्ये ध्रुव-तेजस नसणार; कारण काय ?)
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालकासमोरचा डिस्प्ले हा १२.३ इंचांचा विस्तीर्ण असा एकच डिस्प्ले आहे. या गाडीतील अगदी मूलभूत व्हर्जनमध्येही हाच डिस्प्ले मिळणार आहे. गाडीचं सगळ्यात खालचं व्हर्जन हे २१.९० लाख रुपयांना उपलब्ध असेल. तर त्याहून वरंच व्हर्जन ३०.९० लाख रुपयांना मिळणार आहे. या डिस्प्लेमध्ये चालकासमोरचं कंट्रोल आणि इन्फोटेनमेंट प्रणाली सामावलेली आहे. भारतात ३५ लाख रुपयांच्या खाली असलेल्या या एकमेव गाडीत इतका मोठा डिस्प्ले आहे. (Mahindra XEV 9E)
शिवाय या गाडीत आहे चक्क एक सेल्फी कॅमेरा. ही सोयही फक्त मर्सिडिझमध्ये आहे. या कॅमेरातून तुम्ही चालकावर लक्ष ठेवू शकता, डिस्प्लेमधील गोष्टी पाहू शकता आणि गाडीत बसूनच ऑनलाईन मिटिंगही भरवू शकता. गाडीचा वेग किती आहे, गाडीला पुढे कुठच्या दिशेनं जायचं आहे तसंच चालकाला सुरक्षेविषयीचे संदेश असं सगळं समोरच्या स्क्रीनवरच कळू शकतं. त्यासाठी लागणारा ऑगमेंटेड रियालिटी डिस्प्लेही कारमध्ये आहे. (Mahindra XEV 9E)
At Mahindra, safety isn’t just a feature – it’s a commitment to our customers and a cornerstone of our vision to shape the future of mobility.
We’re proud to announce that the Mahindra BE 6 and XEV 9e have achieved a stellar 5-star BNCAP Safety Rating. The XEV 9e leads with a… pic.twitter.com/TBLtVd10qB
— Mahindra Group (@MahindraRise) January 16, 2025
गाडीत १६ स्पीकर असलेली ध्वनी यंत्रणा आहे. त्यामुळे गाणी ऐकण्याचा तुमचा अनुभवही वेगळा असणार आहे. त्यासाठी हर्मन कंपनीचे स्पीकर बसवण्यात आले आहेत. तसंच गाडीचं छत हे स्वयंप्रकाशित असेल. तसे दिवेच वर बसवण्यात आले आहेत. शिवाय ही कार ऑटो – पार्क होऊ शकेल. तशी यंत्रणा या कारमध्ये आहे. (Mahindra XEV 9E)
(हेही वाचा- धनंजय मुंडेंच्या काळात दीड हजार रुपयांचे पंप खरेदी केले साडेतीन हजाराला; Bombay High Court ने उपस्थित केले प्रश्न)
महिंद्रा एक्सईव्ही ९ई ही गाडी २१.९० ते ३०.५० लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे. सध्या तरी या गाडीची कुणाशीही स्पर्धा नाही. पण, टाटा हॅरिअरची इव्ही काही महिन्यातच येऊ घातली आहे. या दोघांमध्ये नक्की स्पर्धा असेल. (Mahindra XEV 9E)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community