-
ऋजुता लुकतुके
एखादी गाडी जेव्हा सतत रस्त्यावर ट्रायल सुरू असतान दिसते तेव्हा खरं समजतं गाडी लाँचिंगसाठी तयार होतेय. सध्या महिंद्राच्या एक्सयुव्ही ३०० (Mahindra XUV300 2024) या गाडीच्या बाबतीत तसं म्हणता येईल. एक्सयुव्ही श्रेणीतील गाडीचा नवीन फेसलिफ्ट बाजारात येण्यासाठी सज्ज झाला आहे. आधुनिक फिचर्स आणि जास्त ताकद असं या फेसलिफ्टचं वर्णन करता येईल. महिंद्रा ही भारतातील आघाडीची युटिलिटी व्हेहिकल बनवणारी कंपनी आहे. आता एक्सयुव्ही ३०० (Mahindra XUV300 2024) गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जन विक्रीसाठी तयार असल्याचं कंपनीनेही जाहीर केलं आहे.
नवीन गाडीत पुढचे एलईडी दिवे, डीआरएल आणि ग्रील यांच्या डिझाईनमध्ये मूलभूत बदल करण्यात आले आहेत. सी आकाराचे एलईडी डीआरएल या गाडीत बसवण्यात आले आहेत. ग्रील आधुनिक आणि आकर्षक आहे. तर गाडीचा बंपरही बराच बदलण्यात आला आहे. गाडीच्या मागच्या बाजूलाही एलईडी टेल लँपची एक माळ आहे. बंपरचा लुक पूर्णपणे बदलला असून तो जास्त आकर्षक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आधीसारखे मागच्या काचेवरही वयापर असतील. तर बंपरवर रिफ्लेक्टरही असतील. अलीकडेच होळीच्या दिवशी महिंद्रा कंपनीने आपल्या या फेसलिफ्ट गाडीचं पहिलं दर्शन सोशल मीडियावर घडवून आणलं होतं. (Mahindra XUV300 2024)
(हेही वाचा – Dadasaheb Phalke – भारतीय चित्रपटाचे जनक)
May 2024 lead you to new adventures. #HappyNewYear #XUV300 #LiveLifeThrillSize #TurboSport pic.twitter.com/kn4Qqb1a7a
— MahindraXUV300 (@MahindraXUV300) December 31, 2023
जुन्या एक्सयुव्हीच्या मानाने नवीन गाडीत अंतर्गत रचनेत अनेक मूलभूत बदल झाले आहेत. मोठी इन्फोटेनमेंट यंत्रणा, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, डिजिटल क्लस्टर, नवीन स्टिअरिंग व्हील, याशिवाय अघिकचे पैसे मोजून तुम्ही ३६० अंशांचा सराऊंड कॅमेरा, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर आणि एडीएएस यंत्रणा अशा आधुनिक सुविधाही तुम्हाला मिळू शकतील.
भारतात या गाडीची स्पर्धा असेल ती टाटा निक्सॉन, किया सॉनेट, ह्युंदे व्हेन्यू, रेनॉ किगर, निस्सान मॅग्नेट, मारुती सुझुकी ब्रेझा आणि सिट्रॉन एअरक्रॉस या गाड्यांशी असेल. महत्त्वाचं म्हणजे या गाडीची किंमत ८.१० लाख रुपयांपासून सुरू होत १७.७५ लाखांपर्यंत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community