आता फेसबुकवर झटपट बनवा ‘REELS’! मेटाकडून नव्या चार अपडेटची घोषणा

सोशल मीडियाचे वापरकर्ते अलिकडे मोठ्या संख्येने वाढले आहेत. इन्स्टाग्रामच्या रिल (REEL) या फिचरला युजर्सची पसंती मिळत आहेत. फेसबुकवर सुद्धा रिल या पर्याय मेटाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु फेसबुकवर फक्त ६० सेकंदाचे रिल अपलोड करण्याची मर्यादा होती. आता मात्र नव्या अपडेटनुसार फेसबुकवर ९० सेकंदापर्यंत रिल अपलोड करता येणार आहे. तसेच फेसबुक युजर्स त्यांच्या मेमरिज स्टोरिजच्या रिल्स सुद्धा आता बनवू शकणार आहेत. मेटाने या नव्या अपडेट संदर्भात घोषणा केली आहे.

( हेही वाचा : आकाशातून टेहाळणी करणार भारतीय जवान; सैन्याकडून ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ची चाचणी )

गेल्यावर्षी इन्स्टाग्रामप्रमाणे मेटाने फेसबुकवर सुद्धा रिलचा पर्याय सुरू केला होता. यानंतर यात अनेक बदल करण्यात आले. इन्स्टाग्रामप्रमाणे फेसबुकवर जास्त सेकंदाची रिल्स अपलोड करता येत नाही अशा तक्रारी युजर्सकडून वारंवार प्राप्त होत होत्या त्यामुळे आता मेटाने यासंदर्भात घोषणा केली आहे.

नवे अपडेट

  • ९० सेकंदापर्यंत रिल्स अपलोड करता येणार
  • ग्रूव्ह फिचर लॉंच करण्याच आले असून यामुळे युजर्स व्हिडिओमधील गाण्याच्या बीट्सवर आपला व्हिडिओ सिंक करू शकतात.
  • रिल्स करण्यासाठी फेसबुककडून नवे टेम्प्लेट्स उपलब्ध
  • मेमरिजच्या आधारे रेडिमेड रिल्स बनवणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here