Malabar Hill : मुंबईतलं प्रशस्त ठिकाण! का करतं हे ठिकाण लोकांना आकर्षित?

119
Malabar Hill : मुंबईतलं प्रशस्त ठिकाण! का करतं हे ठिकाण लोकांना आकर्षित?

मुंबईतल्या मलबार हिलशी (Malabar Hill) निगडीत मोठा आणि समृद्ध इतिहास आहे. मलबार हिल्सच्या पहिल्या नोंदी जवळपास एक हजार वर्ष जुन्या आहेत. पूर्वी वाळकेश्वर हे मलबारशी जोडलेलं सर्वात जुनं नाव होतं. त्याचा उल्लेख भगवान श्रीराम आणि वाळकेश्वर मंदिराची कथा असणारा शतकानुशतके जुनं असलेलं, संस्कृत भाषेतलं वाळकेश्वर महात्म्य नावाच्या पुस्तकात आढळतो.

१२व्या शतकातलं प्रसिद्ध हिंदू मंदिर वाळकेश्वर या सिलाहार राजांच्या राजवटीत बांधण्यात आलेल्या या ठिकाणावरून या स्थानाचं नाव वाळकेश्वर असं पडलं. सिलाहार राजवंशाने बेटांवर राज्य केलं. त्या बेटांना आज मुंबई म्हणून ओळखलं जातं. सिलाहार यांच्या ताब्यात कोकणातलाही काही भाग होता. १६७० च्या दशकामध्ये भारताला भेट देणारे एक ब्रिटिश सर्जन डॉ. जॉन फ्रायर हे या खडकाळ टेकडीचा उल्लेख करणारे कदाचित पहिलेच होते.

(हेही वाचा – Mumbai Ring Road : मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा; ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी)

मलबार हिलचा (Malabar Hill) संपूर्ण परिसर आज मुंबईतल्या उच्चभ्रू लोकांशी संबंधित आहे. या परिसरात श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांची निवासस्थानं आहेत. पण आज ज्या परिसरात उच्चभ्रू लोकांची निवासस्थानं आहेत, तिथे १९व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत संपूर्ण जंगल होतं. या संपूर्ण परिसरात हायना आणि कोल्हे सहज दिसायचे. या टेकडीचा फक्त दक्षिण-पश्चिम भाग हा अर्धवट लोकवस्तीचा होता. कारण त्या भागात हिंदू मंदिरं आणि बाणगंगा नावाचं एक सरोवर होतं. उत्तरेला एक पारसी स्मशानभूमी होती. ही स्मशानभूमी १७व्या शतकात कधीतरी बांधण्यात आली होती.

१८३० च्या मध्यात मुंबई गव्हर्नरचे अधिकृत निवासस्थान मलबार हिल येथे स्थलांतरित करणे हा एक मोठा टर्निंग पॉइंट होता. गव्हर्नरचं अधिकृत निवासस्थान पूर्वी परळ येथे होतं. पण त्या काळात कॉलरा सारख्या रोगांची वाढ झाली होती. कॉलरामुळे गव्हर्नरनी त्यांची पत्नी गमावली होती. त्यातच त्यांच्या निवसस्थानाच्या आजूबाजूला झपाट्याने झोपडपट्टी वाढत चाललेली. त्यामुळे मुंबईचे त्या काळचे गव्हर्नर सर जे. फर्ग्युसन यांनी आपलं निवासस्थान मलबार हिल येथे स्थलांतरित करण्याचा हा निर्णय घेतल्याचं कळतं.

(हेही वाचा – Dr. Prachi Jambhekar यांची महापालिकेतच आता उपायुक्तपदी प्रतिनियुक्ती)

मलबार हिल्स (Malabar Hill) या ठिकाणी राज्यपालांच्या बंगल्याचा विकास झाला. त्याला आता राजभवन असं म्हणतात. इथे समाजातल्या उच्चभ्रू लोकांसाठी आजूबाजूचा निवासी परिसर एकमेकांशी जोडलेले आहे. समाजातले उच्चभ्रू लोक या परिसरात राहायला आले कारण फोर्ट परिसर हा व्यावसायिक केंद्र बनला. त्यानंतर मलबार हिल हा शहराचा निवासी भाग म्हणून ओळखला जायला लागला. मलबार हिल्सच्या भागात फक्त श्रीमंत आणि शक्तिशाली लोकच राहतात.

(हेही वाचा – Child Pornography पॉक्सो अंतर्गत गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल)

या स्थानाची ठळक वैशिष्ट्ये :-
  • वाळकेश्वर मंदिर आणि बाणगंगा सरोवर

१२व्या शतकामध्ये सिलाहार राजांच्या एका मंत्र्याने हे भगवान शंकराचं मंदिर बांधलं होतं. हे मंदिर रामायणातल्या कथेशी निगडित आहे. असं म्हटलं जातं की, रावणाने पळवून नेलेल्या सीतेचा पाठलाग करत असताना रामाने आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवान रामाने वाळूपासून मूर्ती तयार केली. तेव्हाच या मंदिराचं नाव वाळकेश्वर असं पडलं. हे मंदिर पोर्तुगीजांनी नष्ट केलं होतं. नंतर १७१५ सालच्या सुमारास रमा कामत नावाच्या एका व्यापारी आणि समाजसेवी महिलेने ते मंदिर पुन्हा बांधलं.

रावणाचा पाठलाग करताना भगवान श्रीरामाने आपली तहान शमवण्यासाठी एका ठिकाणी जमिनीवर बाण मारला. त्यावेळी त्या परिसरात बाणगंगा नावाचं सरोवर तयार झालं. समुद्राच्या अगदी जवळ असूनही या सरोवरात गोड पाणी आहे. हे पाणी जमिनीखाली असलेल्या झऱ्यातून येत आहे. हे ऐतिहासिक ठिकाण अनेक चित्रपट आणि शॉर्टफिल्म्समध्ये दाखवण्यात आलं आहे. आपली समृद्ध संस्कृती आणि वारसा पुढे चालवण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी बाणगंगा महोत्सव आयोजित केला जातो.

(हेही वाचा – Google भारतात करणार एआयमध्ये गुंतवणूक)

  • हँगिंग गार्डन्स

मलबार हिल (Malabar Hill) येथे असलेल्या हँगिंग गार्डन्सचं मूळ नाव प्रसिद्ध पारशी स्वातंत्र्यसैनिक यांच्या नावावरून फिरोजशाह मेहता गार्डन्स असं ठेवलेलं आहे. हे गार्डन्स १८८० साली बांधण्यात आले होते. या गार्डन कॉम्प्लेक्समध्ये कमला नेहरू पार्कचाही समावेश आहे. इथे असलेला म्हातारीचा बूट हे इथे येणाऱ्या लोकांसाठी खास आकर्षण आहे.

  • बाबू अमीरचंद पनालाल आदिश्वर जैन मंदिर

हे मंदिर १९०४ साली बांधलं गेलं होतं. हे मंदिर जैन तीर्थंकर भगवान आदिश्वर यांना समर्पित आहे. सुंदर कोरीव काम आणि सुंदर पेंटिंग्जने हे मंदिर सजवलेलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.