कोण आहे मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणारी मुलगी, जी झालीय मोठ्या ब्युटी ब्रांडची अँबॅसिडर?

मुंबईतल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मलिशाने हल्ली काही वर्षांमध्ये कितीतरी मॉडेलिंग गिग्स तयार केले आहेत.

385
कोण आहे मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राहणारी मुलगी, जी झालीय मोठ्या ब्युटी ब्रांडची अँबॅसीडर?

फॉरेस्ट एसेनशिअल्स नावाच्या ब्युटी ब्रॅण्डने हल्लीच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी आश्चर्यचकित होऊन आणि तितक्याच आनंदाने या ब्रॅण्डच्या दुकानात शिरताना दिसतेय. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून याच फॉरेस्ट एसेनशिअल्स नावाच्या ब्युटी ब्रॅण्डतर्फे लॉन्च करण्यात आलेल्या ‘द युवती’ कलेक्शनची ब्रॅण्ड अँबॅसिडर आहे. या मुलीचे नाव मलिशा खारवा आहे. मलिशा ही चौदा वर्षांची असून ती धरावी येथील झोपडपट्टीत राहते. व्हिडिओच्या कॅपशनमध्ये लिहिले आहे की, ‘आपल्या स्वप्नांना सत्यात उतरलेले पाहून या मुलीच्या चेहेऱ्यावर वेगळीच चमक आलीय.’

मुंबईतल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मलिशाने हल्ली काही वर्षांमध्ये कितीतरी मॉडेलिंग गिग्स तयार केले आहेत. मलिशाने ‘लिव्ह युअर फेअरिटेल’ नावाच्या शॉर्टफिल्ममध्येही काम केले आहे आणि आता ती एका मोठ्या ब्रॅण्डची अँबॅसिडर झाली आहे. नव्या तरुण पिढीला मानसिक दृष्टीने बळकट बनवण्याच्या हेतूने मालिशाला कंपनीने ब्रॅण्ड अँबॅसिडर केले.

(हेही वाचा – Konkan News : मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे तिकिट आरक्षणातील काळाबाजार उघड)

2020 साली हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन जेव्हा आपल्या गाण्याची शूटिंग करण्यासाठी मुंबईत आला होता तेव्हा त्याने मलिशाला पहिल्यांदा पाहिलं. मलिशा चौदा वर्षांची असून तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला दोन लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

फॉरेस्ट एसेनशिअल्सने शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. देशभरातले लोक मलिशाचं कौतुक करत आहेत. लोक तिला भरभरून आशीर्वाद आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

मलिशाकडे पाहून छोट्या भागातल्या मुलांची मोठी स्वप्न पूर्ण होतात असा विश्वास तिच्या बरोबरीच्या मुलांना वाटत आहे. तिच्या वयाच्या कित्येक मुली आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे पाहून सकारात्मक दृष्टिकोन बाळगत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.