मालवणात पर्यटन महोत्सव!

मालवण नगरपरिषदेच्यावतीने १३ ते १५ मे दरम्यान पर्यटन महोत्सव २०२२ हा दांडी समुद्र किनारी साजरा करण्यात येणार आहे. हे तीन दिवस पर्यटना महोत्सवाचे प्रमुख दिवस असले तरी ९ मे पासूनच विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी या पर्यटन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

( हेही वाचा : सोलो ट्रिपला जाताय? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा! )

पर्यटन महोत्सव कार्यक्रमपत्रिका

शुक्रवार १३ मे 
 • सकाळी ७ वाजता वाळू शिल्प कलाकृती.
 • सायंकाळी ४ ते ५ स्थानिक मालवणी खाद्य पदार्थांची पाककला स्पर्धा.
 • ५ ते ५.३० वाजता स्थानिक कलाकारांचे गायन.
 • ५.३० ते ६ उद्घाटन समारंभ.
 • ६.३० ते रात्री १० गायन व नृत्य स्पर्धा.
 • स्थानिक दशावतार : महिला व पुरुष.

शनिवार १४ मे –

 • सायंकाळी ४ ते ६ खेळ पैठणीचा.
 • संध्याकाळी ७ ते रात्री १० मालवण सुंदरी स्पर्धा, आमदारश्री शरीरसौष्ठव स्पर्धा.

रविवार १५ मे –

 • सायंकाळी ५ ते ६ स्थानिक कलाकारांचे गीतगायन.
 • ६ ते ७ बक्षिस वितरण व सांगता समारंभ.
 • ७ ते १० जल्लोष सिनेकलावंतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम.

या पर्यटन महोत्सवादरम्यान पर्यटकांना जलसफारी व वॉटरस्पोर्टचा मनमुराद आनंद सवलतीच्या दरात नगरपालिका, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जलक्रीडा व्यावसायिकांच्या मदतीने घेता येईल. महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यासाठी ९४२२४३५०९५ यावर संपर्क करावा, असे आवाहन मालवण नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here