पुणे तिथे काय उणे? असं म्हटलं जातं. कारण पुण्यात प्रत्येक गोष्ट मिळते असा एक समज आहे. बाजीराव पेशव्यांची ही भूमी. ही विद्वानांची भूमी मानली जाते. हे विद्येचं माहेरघर मानलं जातं. अशा या भूमीत अनेक शैक्षणिक संस्था आहेत. इथे उत्तम दर्जाचे मॅनेजमेंट कॉलेजही आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच चांगल्या कॉलेजची माहिती देणार आहोत. (Management Colleges In Pune)
विशेष म्हणजे या महाविद्यालयांचा प्लेसमेंट रेकॉर्ड चांगला आहे आणि मॅनेजमेंटमध्ये दर्जेदार शिक्षण प्रदान करतात. चला तर अशा कॉलेजेसबद्दल माहिती मिळवूया आणि आपल्या करिअरला दिशा देऊया. (Management Colleges In Pune)
डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल :
ही संस्था पहिल्या वर्षासाठी ₹३,९७,५०० एवढे शुल्क आकारते. ही संस्था एमबीए/पीजीडीएम प्रोग्राम प्रदान करते. डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल पदवीधरांसाठी सरासरी पॅकेज रु. १८,००,००० प्रदान करते. त्यामुळे फी जास्त असली तरी इथून करिअरची चांगली संधी प्राप्त होते. (Management Colleges In Pune)
सिम्बायोसिस इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (एसआयबीएम) :
एसआयबीएम येथे उत्कृष्ट पायाभूत सुविधा असल्यामुळे आणि उच्च दर्जाची शैक्षणिक प्रणाली येथे उपलब्ध असल्यामुळे सातत्याने भारतातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. एसआयबीएम पदवीधरांसाठी सरासरी पॅकेज सुमारे रु. ४९,००,००० प्रदान करते, तसेच सर्वोच्च पॅकेज रु. ६७,६०,००० पर्यंत आहे. (Management Colleges In Pune)
(हेही वाचा – Nagpur Accident: नागपुरातही ड्रंक अँड ड्राईव्ह! आई- वडिलांसह ३ महिन्याच्या चिमुकल्याला उडवलं)
इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (आयएसएमएस) :
आयएसएमएस ही पुण्यातील आणखी एक उत्कृष्ट संस्था आहे. येथे वर्षाला रु. ४,५०,००० फी आकारली जाते आणि यामध्ये MBA/PGDM अभ्यासक्रम प्रदान केला जातो. आयएसएमएस मधील पदवीधरांचे सरासरी पॅकेज रु. ३८,००,००० आहे. (Management Colleges In Pune)
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट (एससीएमएचआरडी) :
एससीएमएचआरडी येथे सामाजिक जीवनावर लक्ष केंद्रित करून MBA/PGDM अभ्यासक्रम प्रदान केला जातो. इथे प्रॅक्टिकल ज्ञान मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळते. एससीएमएचआरडी पदवीधरांसाठी अंदाजे ₹६७,६०,००० प्रदान करते. (Management Colleges In Pune)
डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (पीयूएमबीए) :
या संस्थेला पुणे युनिव्हर्सिटी एमबीए म्हणूनही ओळखले जाते. ही भारतातील एक प्रमुख बिझनेस संस्था आहे. पीयूएमबीए येथे मॅनेजमेंट, आयटी, फार्मसी, अभियांत्रिकी असे विविध अभ्यासक्रम प्रदान केले जातात. इथे बीबीए आणि एमबीए साठी एकूण ३६० विद्यार्थी प्रवेश मिळवू शकतात. (Management Colleges In Pune)
बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट (बीआयएमएम) :
बीआयएमएम ही पुण्यातील श्री बालाजी विद्यापीठाची प्रमुख संस्था आहे. ही संस्था सर्वात जुनी संस्था तर आहेच, त्याचबरोबर केवळ पुण्यातीलच नव्हे तर भारतातील सर्वोत्कृष्ट बी-स्कूल संस्थांपैकी एक संस्था म्हणून उदयास येत आहे. इथे २ वर्षांचा पूर्णवेळ एमबीए अभ्यासक्रम प्रदान केला जातो. या संस्थेची रेटिंग देखील चांगली आहे. (Management Colleges In Pune)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community