मानिके मांगे हिथेची भारतीयांना भुरळ! कोणत्या भाषेतलं आहे हे गाणं?

मानिके मांगे हिथे या गाण्याने सध्या संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. संगीताला सीमा नसते असं म्हंटलं जातं. या गाण्याने ते सिद्ध करुन दाखवलं. या गाण्याची भाषा  समजत नसतानाही लोकांनी या गाण्याला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. लोकांनी हे गाणं अक्षरश: उचलून धरलं आहे. श्रीलंकेतील योहानी या गायिकेने हे गाणं गायलं आहे.

तुफान व्हायरलं झाल गाणं

योहानी डिसिल्व्हा 28 वर्षीय श्रीलंकन गायिकेने गायलेलं मानिके मांगे हिथे हे गाणं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. श्रीलंकेतील लोकप्रिय युट्यूबर अशी तिची ओळख आहे. श्रीलंकेतील सिंहली या भाषेत गायलेलं हे गाणं भाारतात प्रचंड व्हायरल झालं आहे. खुद्द भारतीय सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी हे गाणं शेअर केलं.

धकधक गर्ल माधुरीनेही या गाण्यावर ठेका धरला. त्यानंतर देसी गर्ल प्रियंका चोप्राने सुद्धा हे गाणं शेअर करत, हे गाणं आपल्याला भावल्याचं सांगितलं. हे गाणं गाताना मला वाटलं सुद्धा नव्हतं की, हे गाणं इतकं लोकप्रिय होईल, असं सोशल मीडिया सेंसेशन बनलेल्या योहानीने म्हटलं आहे. सिंहली भाषेत गायल्यानंतर तिने तमीळ आणि मल्याळम भाषेतही हे गाणं गायलं आहे.

अनेक भाषांमध्ये या गाण्याचे व्हर्जन्स

भारतात मात्र या गाण्याचे बरेच व्हर्जन्स आले आहेत. पुण्यातील ट्रॅफिक पोलिस आतिष खराडे यांनी या गाण्याचं मराठी व्हर्जन तयार केलं आहे. त्यात त्यांनी योहानी या सिंगरच्या सौंदर्याने भुरळ घातल्याचंही म्हटलं आहे. तसेच अपूर्वा नानीवडेकरने सुद्धा या गाण्याचं मराठी व्हर्जन गायलं आहे. हिंदी, बंगाली, कोंकणी, गुजराती अशा ब-याच भारतीय भाषांमध्ये या गाण्याचे व्हर्जन्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हर्जन्सनाही लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here