मसाई मारा आणि विल्डेबीस्टचे स्थलांतर, एक अनोखा अनुभव!

उत्तरी टांझानिया आणि केनियामध्ये विल्डेबीस्ट प्राण्यांच्या मोठ्या कळपांचे वार्षिक स्थलांतर ही खरोखरच एक नेत्रदीपक घटना आहे. सेरेनगेटी आणि मसाई मारा पर्यावरणातील सुमारे दोन दशलक्ष विल्डेबीस्ट आणी झेब्रा हे नियमित पध्दतीने हिरव्या कुरणाचा शोध घेण्यासाठी स्थलांतर करतात. हा वन्यजीवन जगतातील सगळ्यात मोठा चमत्कार आहे.

मसाई मारा नॅशनल पार्क हे आफ्रिकेमधील केनिया या देशामध्ये वसलेले सगळ्यात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आज दिसणाऱ्या या मसाई माराची स्थापना १९६१ साली झाली असून ते १,५१० चौ.कि.मी. एवढ्या परिसरात विस्तारलेले आहे. २००० वर्षांपूर्वी निओलिथिक मानवाने वापरलेली शस्त्रे आणि भांडी या नॅशनल पार्कमध्ये सापडलेली आहेत. याचा अर्थ असा होतो कि हे नॅशनल पार्क प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. सुमारे १७ व्या शतकापासून मसाई जमातीच्या लोकांनी या भागाचा ताबा घेतला आहे. त्यामुळॆ हे नॅशनल पार्क फक्त वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध नव्हे तर हे मसाई जमातीतील लोकांची जन्म आणि कर्मभूमी आहे. तेच येथील खरे जमीनदार आहेत असे म्हटले तरी चूक ठरणार नाही.
मसाई मारा हे वन्यजीव संवर्धनाचे एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे, जे वन्यजीवांच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. सिंह, चीता, विल्डेबीस्ट, हत्ती, गेंडा, आफ्रिकन म्हैस, जिराफ, झेब्रा आणि बरेचसे प्राणी येथे त्यांच्या नैसर्गिक वस्तीत, निर्बंध नसलेले आणि अनेक मैलांवर पसरलेल्या रानात फिरतांना पहायला मिळतात.

विल्डेबीस्ट प्राण्यांचे स्थलांतर

ग्नू म्हणून ओळखला जाणारा विल्डेबीस्ट हा प्राणी मृग कुटुंबातील एक सदस्य आहे. त्याच्या शरीराचा पुढील भाग बांधला गेला असतो, तर मुख्य भाग थोडा पायांनी पातळ असतो. विल्डेबीस्टच्या अनेक प्रजाती आहेत. केनिया आणि टांझानियामधील मारा – सेरेनगेटी इकोसिस्टमच्या मोठ्या कळपात तयार होणारी प्रजाती पश्चिम पांढरी दाढी असलेले विल्डेबीस्ट म्हणून ओळखले जातात, तर ग्रेगोरी रिफ्टच्या पूर्वेस केनिया आणि टांझानियामध्ये राहणारे पूर्ण पांढरी दाढी असलेलेही विल्डेबीस्ट म्हणून ओळखले जातात.
उत्तरी टांझानिया आणि केनियामध्ये विल्डेबीस्ट प्राण्यांच्या मोठ्या कळपांचे वार्षिक स्थलांतर ही खरोखरच एक नेत्रदीपक घटना आहे. सेरेनगेटी आणि मसाई मारा पर्यावरणातील सुमारे दोन दशलक्ष विल्डेबीस्ट आणी झेब्रा हे नियमित पध्दतीने हिरव्या कुरणाचा शोध घेण्यासाठी स्थलांतर करतात. हा वन्यजीवन जगतातील  सगळ्यात मोठा चमत्कार आहे. विल्डेबीस्ट स्थलांतरणाची नेमकी वेळ संपूर्णपणे पावसाळ्याच्या अंदाजावर अवलंबून असते. या स्थलांतरामध्ये सुमारे १.५० दशलक्षांपेक्षा जास्त विल्डेबीस्ट, २ लाख  झेब्रा आणि इतर मृग जातीचे प्राणी सहभागी होतात. हे स्थलांतर एखाद्या गोंधळलेल्या चळवळीसारखे दिसते परंतु संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे कि ह्या कळपामधील प्रमुख विल्डेबीस्ट पद्धतशीरपणे संपूर्ण कळपाची शिस्त नियंत्रित करतात आणि अडथळ्यांवर मात करून मार्गक्रमण करतात. विल्डेबीस्ट स्थलांतराचा नकाशा पाहून तुम्हाला ह्या घटनेची कल्पना अधिक चांगली येऊ शकते.
 

विल्डेबीस्ट स्थलांतराची पद्धत! 

  • अंदाज घेऊन नदी ओलांडतात! –  विल्डेबीस्ट नदीपर्यंत पोहोचले म्हणजे ते नदी ओलांडणार असे अजिबात नाही. काही जण पाण्याजवळ पोहचतात आणि त्वरित पोहतात; काही पोहचतात आणि तिथेच वेळ घालवतात. काही पोहचतात आणि तेथून परत मागे येतात. त्यामुळे नदी ओलांडण्याचा अंदाज कोणालाही लावणे शक्य नाही.
  • स्थलांतर केवळ जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होते! – बहुतेक लोकांचे मत आहे की विल्डेबीस्ट स्थलांतर केवळ जुलै ते ऑक्टोबर दरम्यानच होते, परंतु प्रत्यक्षात ही वर्षभराची घटना आहे. हे मात्र नक्की की नदी ओलांडणे ही  घटना सहसा सफारीच्या उच्च हंगामाशी (जुलै ते ऑक्टोबर) सुसंगत असते आणि म्हणूनच जुलै ते ऑक्टोबर हा वर्षातील हा एकमेव असा  काळ आहे की विल्डेबीस्टच्या चांगल्या हालचाली पाहायला मिळतात आणि व्यावसायिक फोटोग्राफर्स  देखील हाच काळ मसाई मारा येथे येण्यास पसंद करतात.
  • विल्डेबीस्टना मारा नदी ओलांडताना पाहणे हा अनोखा क्षण! – त्या वेळेस नदीतल्या मगरींच्या विळख्यात सापडलेल्या, विल्डेबीस्टची स्वतःचा जीव वाचवण्यासाठीची होणारी धडपड आपल्या मनाला वेदना देऊन जाते. परंतु निसर्गाच्या ह्या नियमाचे स्वागत करून इतर वन्यजीवन पाहण्यासाठी आपण स्वतःला तयार ठेवतो आणि एक अनोखा अनुभव आणि आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला लागतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here