मराठी संस्कृती ही परंपरा आणि चालीरितींनी समृद्ध आहे. या लेखात आम्ही मराठी वधूचे 10 छान लूक एक्सप्लोर केले आहेत. त्यामुळे जे महाराष्ट्रीयन विवाहसोहळ्यांमध्ये वधू नक्कीच उठून दिसेल. (Marathi Look)
१. साडी
पैठणी साडी (saree) मराठी वधूची पहिली निवड असते. रेशमी साडीला असलेले जरीचे काठ, त्यावरील मोराची किंवा फुलांची नक्षी ही परंपरागत असते. वधू सहसा त्यांच्या लग्नासाठी हिरवा, शाही निळा किंवा लाल यांसारखे समृद्ध रंग निवडतात.
(हेही वाचा – Raj Thackeray On Reservation : आरक्षणाच्या वादात पडू नका; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश)
२. शेला
पारंपरिक साडी आणि नऊवारी साडीवर शेला (Shela) घेतला जातो. विवाहाच्या विधींमध्ये याच शेल्याची गाठ वराच्या शेल्यासोबत मारली जाते.
३. नाकाचे सौंदर्य खुलवणारी नथ
नथ (Nath) हा मराठी वधूच्या दागिन्यांचा एक अविभाज्य भाग आहे. मोती, रत्ने आणि वधूच्या नाकाला सुशोभित करणार्या डिझाईन्सने वधूच्या सौंदर्याला अभिजातपणाचा स्पर्श होतो.
४. कोल्हापुरी साज
मराठी नववधू सहसा कोल्हापुरी साज (Kolhapuri Saaj) नेकलेस निवडतात. हा हार वैवाहिक आनंदाचे प्रतीक आहे. हा दागिना पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे. तो एक प्रेमळ वारसा आहे.
(हेही वाचा – Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक, राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन)
५. मंगळसूत्र
महाराष्ट्रात लग्नाच्या विधींमध्ये वधूला मंगळसूत्र (Mangalsutra) घातले जाते. मंगळसूत्र हे सौभाग्य अलंकार मानले जाते.
६. मुंडवळ्या
कपाळावर घातलेला मोत्यांचा किंवा फुलांचा अलंकार मराठी विवाहातील महत्त्वाचा घटक आहे. मुंडवळ्या (Mundavlya) हे वधू आणि वर यांच्यातील पवित्र मिलनचे प्रतीक आहे.
७. हिरव्या बांगड्या
मराठी नववधू ‘चुडा’ म्हणून ओळखल्या जाणार्या हिरव्या बांगड्या (Green Bangles) घालतात.
(हेही वाचा – Mathura Corridor : आता श्रीकृष्णाच्या मथुरेतही कॉरिडॉर; उच्च न्यायालयाची अनुमती !)
८. नऊवारी साडी
नऊवारी साडी (Nauvari saree) ही महाराष्ट्राची पारंपरिक साडी आहे.
९. बाजूबंद
हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी बाजूबंद (Bajuband) घातले जातात.
१०. चंद्रकोर
चंद्रकोराच्या आकाराची टिकली (Chandrakor Bindi) हे मराठी वधूच्या लुकचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community