जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशाच प्रकारे, महिलांच्या बुद्धी, सौंदर्य आणि कलेला व्यासपीठ देणाऱ्या ‘अप्सरा’ या स्पर्धेचे आयोजन मराठी संस्कृती संवर्धन मंडळातर्फे रविवार, ६ मार्चला करण्यात आले होते. लग्न झालेल्या आणि प्राथमिक फेरीत निवड केलेल्या ३० अप्सरांनी अंतिम फेरीत सहभाग घेतला होता. या स्पर्धेला सौंदर्य स्पर्धा म्हणून नाही तर लावण्य स्पर्धा म्हणून पहा असे मराठी संवर्धन मंडळाच्या आयोजिका सुप्रिया दरेकर यांनी सांगितले.
( हेही वाचा : कोकण किनाऱ्यावर झाले दुर्मिळ कासवांच्या पिल्लांचे दर्शन! )
स्त्रियांना संधी
गणपती बाप्पाचे स्मरण करत स्पर्धेला प्रारंभ झाला, या स्पर्धेचे परीक्षण अभिनेत्री अदिती सारंगधर, रुता जितेंद्र आव्हाड आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी केले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॅम्प वॉक, स्वत:चा परिचय व शेवटी प्रश्न उत्तरे अशा फेऱ्या झाल्यानंतर तीन विजेत्या अप्सरांची निवड करण्यात आली. मानाच्या अप्सरेचा मुकुट रश्मी वर्तक यांनी पटकावला, तर दुसरा व तिसरा क्रमांकावर अनुक्रमे श्रद्धा वाझे आणि निर्मला वर्णेकर विजेत्या झाल्या. अशा स्पर्धांमुळे खऱ्या अर्थाने स्त्रियांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याची संधी मिळते असे सांगत सर्व अप्सरांनी आयोजिका सुप्रिया दरेकर यांचे आभार मानले.
विजेत्या अप्सरा
- रश्मी वर्तक
- श्रद्धा वाझे
- निर्मला वर्णेकर